💥गंगाखेड शहरातील दोन व्यापारी संकुलात आढळले रक्ताचे डाग.....!

💥पोलिस प्रशासनाने केले तपासकामी श्वानपथकास पाचारण💥

परभणी (दि.१५ डिसेंबर) - जिल्ह्यातील गंगाखेड शहरातल्या दोन व्यापारी संकुलात आज मंगळवार दि.१५ डिसेंबर २०२० रोजी रक्ताचे डाग आढळल्याने शहरात जोरदार चर्चांना उधाण आले होते.नेमका प्रकार कश्याचा मारहाण की अजून काही याबाबत तर्कवितर्क लढवल्या जात असून गंगाखेड पोलिस प्रशासन अधिक तपास करत आहेत.दरम्यान गंगाखेड पोलिस प्रशासनाकडून तपासकामी श्वानपथकासह फॉरेन्सीक विभागास पाचारण करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यानी दिली.

गंगाखेडातील दोन व्यापारी संकुलात आज मंगळवारी मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याचे दिसून आले. यामुळे मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे व्यापारी संकुल असल्याने येथे नागरिकांची सातत्याने वरदळ असते.शहरातील मध्यवस्तीत भल्या पहाटे ही बाब लक्षात आल्याने चर्चांना उधाण आले. नागरिकांनी गंगाखेड पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने श्वानपथकासह फॉरेन्सीक विभागास पाचारण केले. श्वान मात्र तेथेच घुटमळले. 

दरम्यान, घटनास्थळी रक्ताचे डाग दिसून आले. तेथे काही वस्तूही सापडल्या. मारहाणीचा वगैरे काही प्रकार असावा, त्या दिशेनेही तपास सुरू आहे. फॉरेन्सीक विभागाचे कर्मचारी, श्वानपथकाकडूनही पाहणी केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी दिली.

दरम्यान, मंगळवारी सकाळपासून शहरात उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे. व्यापारी संकुल परिसरात रात्रीच्या वेळी कोणीच नसते. त्यामुळे नेमका प्रकार काय घडला असावा, याबाबत नागरिकांत भितीचेही वातावरण दिसून येत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या