💥पूर्णेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस रक्तदान शिबीर करून साजरा...!


💥कार्यक्रमास उपस्थित जिल्हा परिषद सदस्य भरत घनदाट यांचा यावेळी सत्कार करण्यात आला💥

पूर्णा (दि.१३ डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्चुअल रॅली आणि रक्तदान शिबिरास कार्यकर्त्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला ता१२ रोजी पूर्णा येथील गोंधळ सम्राट राजारामबापू सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सकाळी १० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत व्हर्च्युअल रॅलीचे थेट प्रक्षेपण आणि त्यानंतर रक्तदान शिबिर पार पडले यावेळी तालुकाध्यक्ष शहाजीराव देसाई यांनी राज्यात सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा असून यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साहेबांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा करावा असे आव्हान केले होते त्यानुसार याठिकाणी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे विचार व्यक्त केले या कार्यक्रमास जि.प.सदस्य भरत घनदाट यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प.स.उपसभापती अशोक बोकारे जि.प‌ सदस्य गजानन आंबोरे ता. उपाध्यक्ष संतोष सातपुते ॲड गोविंद शिंदे  शिवाजी बोबडे  पुंडलिक जोगदंड  श्रीधर पारवे अखिल अहेमद हाजी कुरेशी चांद बागवान प्रभू शिरस्कर विठ्ठल कदम इलियास चाऊस मुंजाजी दिवटे जगन्नाथ कदम गजानन धवन पंढरी कदम माऊली वानखेडे शाहू भुसारे शेषराव खंदारे बाबा पठाण गजानन कदम कैलास कदम राजु नारायणकर बाळू जोगदंड ओम गायकवाड यांच्यासह शहरातील आणि तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या