💥परभणी जिल्ह्यात विशेष पथकाने आज मंगळवारी दिवसभरात अवैध धंद्यांच्या विरोधात केल्या चार धाडसी कारवाया...!

 


💥परभणीसह जिल्ह्यातील सोनपेठ-पुर्णा तालुक्यात विशेष पथकाच्या धाडसत्राने अवैध धंदेवाल्यांमध्ये पसरली घबराट💥

परभणी (दि.८ डिसेंबर) परभणी जिल्ह्यातील अवैध धंद्यांसह बेलगाम झालेल्या गुन्हेगारी प्रवृत्तींना लगाम लावण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी कर्तव्यनिष्ठ व जिगरबाज अधिकारी/कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष पथकाची स्थापणा करून संपूर्ण जिल्हा अवैध धंद्यांसह गुन्हेगारीमुक्त करण्याचा जनुकाही दृढ निर्धारच केल्याचे निदर्शनास येत असून विशेष पथकाकडून एकामागून एक होणाऱ्या धाडसी कारवायांमुळे सैरभैर झालेली गुन्हेगारी प्रवृत्ती व अवैध धंद्यांचे स्वयंघोषीत सम्राट हळूवारपणे जिल्ह्यातून काढता पाय घेत असल्याचे निदर्शनास येत आहे.

जिल्ह्यात आज मंगळवार दि.८ डिसेंबर २०२० रोजी पोलिस उपनिरिक्षक चंद्रकात पवार व विश्वास खोले यांच्या नेतृत्वाखालील  विशेष पथकातले सहकारी कर्मचारी सुग्रीव केंद्रे,नीलेश भुजबळ,यशवंत वाघमारे ,राहूल चिंचाने,शंकर गायकवाड़,अजहर पटेल,विष्णु भिसे,दिपक मुदिराज यांनी आज मंगळवार दि.८ डिसेंबर २०२० रोजी प्रथमतः पुर्णा तालुक्यातल्या ताडकाळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील निळा रोडवर मध्यरात्री १-४५ वाजेच्या सुमारास अवैध चोरट्या रेतीची तस्करी करणाऱ्या टिप्परसह दोन ब्रास चोरटी रेती असा ८ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्याच्या केलेल्या धाडसी कारवाई नंतर पुन्हा सोनपेठ पोलिस स्थानकाच्या हद्दीतील अवलगाव परिसरात अवैध चोरट्या रेतीची तस्करी करणारे शेती उपयोगी वाहन असलेले १ रेतीचे ट्रैक्टर १ ब्रास रेतीसह ताब्यात घेण्याची कारवाई केली या कारवाईत ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाई साठी सोनपेठ पोलिस स्थानकाच्या ताब्यात देण्यात आला यानंतर पुन्हा विशेष पथकाने परभणी शहरातील कोतवाली पोलिस स्थानकाच्या हद्दीतील कृषी नगर परिसरात अवैधरित्या मटका जुगार घेणाऱ्या मटका जुगार चालकावर धाड टाकून जुगार साहित्यासह १३ हजार ९०० रुपयांच्या मुद्देमालासह एक आरोपी ताब्यात घेण्याची कारवाई केली या संदर्भात कोतवाली पोलिस स्थानकात पुढील कारवाई सुरू असल्याचे समजते यानंतर विशेष पथकाने पुन्हा शहरातील नानलपेठ पोलिस स्थानकाच्या हद्दीतील नागसेन नगर परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्यावर धाड टाकून बारा बॉटल विदेशी दारू जप्त केली या कारवाईत विशेष पथकाने  १८७० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला दरम्यान या घटनेतील एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला असला तरी विशेष पथकाने आज दिवसभरात अवैध धंद्याच्या विरोधात एकामागून एक  चार धाडसी कारवाया करीत जिल्ह्यातील अवैध धंदे वाल्यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचे निदर्शनास येत असून विशेष पथकाने केलेल्या या धाडसी कारवायां बद्दल जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीणा आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री मुमका सुदर्शन यानी विशेष पथकाचे अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या