💥पुर्णा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य कारभारा मुळे उसाच्या पिकाचे प्रचंड नुकसान..!


💥धरणात पाणीसाठा मुबलक प्रमाणात असतांनाही अधिकारी वेळेवर पाणी सोडत नसल्याचे उभा उस सुकत आहे💥 

पूर्णा (दि.१४ डिसेंबर) पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य कारभाराचा फटका तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून शेतकऱ्यांचा शेतातील उभा उस अक्षरशः वाळत असून एलदरी सिध्देश्वर धरणाच्या पाण्यावर गतवर्षी १०२७ हेक्टर लागवड केलेला उस उत्पादक शेतकऱ्यांचा शेतातील उभा उस सुकुन व वाळुन जात आहे.धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असूनही पाटबंधारे विभागाचे अधिकारी योग्य वेळी पाणी सोडत नसल्याचे निदर्शनास येत आहे.


 पुर्णा तालूक्यातील तब्बल ६०% शेतजमीन कालव्याच्या पाण्यामुळे बागायती झाली आहे मात्र धरणातील पाणी पाळीचे नियोजन रब्बीसाठी असो की उसासाठी असो त्याला पाणी ऑक्टोबर महीन्यातच मिळणे गरजेचे असतांना मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे अद्याप पर्यंत तालुक्यात पाणी कुठेही पोहोचले नाही त्यामुळे धरणातील पाण्याच्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उसाचे उत्पादन घटनार असून तालुक्यात शेतकऱ्यांचा उस पूर्णतः करपून गेल्याचे दिसत आहे .मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्याने उसाची वाढ चांगली झाली असली तरी मात्र एका पाण्यामुळे उस अक्षरशः वाळून जात असल्याचे दिसत आहे.

********************************************* 💥पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा नियोजनशुन्य कारभार उस उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरतोय - माणिकराव सूर्यवंशी 



पुर्णा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांसह अन्य शेतकऱ्यांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून धरणात पाणीसाठा मुबलक प्रमाणात असतांनाही पाटबंधारे विभागाचे अधिकारी वेळेवर पाणी सोडत नसल्याचे शेतकऱ्यांचा उभा उस वाळत आहे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला पाटबंधारे विभागाचे अधिकारीच सर्वार्थाने जवाबदार असल्याचे मत युवा सेनेचे उपजिल्हाध्यक्ष माणिकराव सुर्यवंशी यांनी म्हटले असून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पाणी न सोडल्यास युवा सेना तिव्र आंदोलन करेल असा इशाराही श्री सुर्यवंशी यांनी दिला आहे..  

 ******************************************** 

    💥धरणातील पानी असूनही काही उपयोग होत नाही खर्चही फिटत नाही - ॲड कैलास पारवे प्रगतसिल शेतकरी गौर 



      या वर्षी कालव्यावर उस लागवड करायचा परंतु पाणी डिसेंबरमध्ये येणार लागवड तारीख उशिरा जाणार म्हणून पुढच्या वर्षी उस कोनताही कारखाना लवकर नेनार नाही म्हणून धरणातील पानी असूनही काही उपयोग होत नाही खर्चही फिटत नाही .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या