💥पूर्णा शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची रिपब्लिकन कामगार सेनेची मागणी....!


💥रिपब्लिकन कामगार सेनेने केली नगर परिषदे समोर धरणे आंदोलनास सुरूवात💥

पूर्णा (दि.१५ डिसेंबर) : पूर्णा नगर परिषद पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे पूर्णा शहरातील नागरिक मागील 25 नोव्हेंबर पासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत, पूर्णा नदीवरील जेकवेल मधील 75 HP चा फुटबॉल असेम्बली खराब झाली असून न.प.प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम मात्र कासव गतीने चालू आहे, न.प.प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था केलेली नाही

पूर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या आदेशानुसार 02 डिसेंबर रोजी पूर्णा शहरात पुढील 10 दिवस पाणी पुरवठा खंडीत राहील असे प्रसिद्धी करण्यात आले होते, पण अध्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही, 

25 नोव्हेंबर ला जेकवेल मधील फुटबॉल बिघडले, 08 दिवसानंतर 02 डिसेंम्बर रोजी अलासमेंट केले जाते की, 10 दिवसात पाणी पुरवठा सुरळीतपणे होईल, अध्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन दिसून येत नसल्यामुळे आणखी किती दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागेल याचा जाब मुख्याधिकारी यांना विचारण्यासाठी रिपब्लिकन कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष जनाब महेबूब कुरेशी यांनी नगर परिषद पूर्णा च्या प्रांगणात धरणे आंदोलन करीत आहेत, अनोलनात सहभागी जनाब महेबूब कुरेशी, रमेश सरोदे, जलील कुरेशी, संजय वाघमारे यांनी धरणे आंदोलनास सुरुवात केलेली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या