💥धनगर साम्राज्य सेनेचने धनगर समाजाच्या विविध मागण्यांच्या अंमलबजावणी साठी दिले निवेदन...!


💥मागण्या मान्य न झाल्यास धनगर साम्राज्य सेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा💥

परभणी लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजाच्या विविध मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे  पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली  18 डिसेंबर रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा परभणी जिल्हाधिकारी यांना लेखी  निवेदनाद्वारे देण्यात आला.


सोमवारी(ता 7) धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले. परभणी लोकसभा मतदार संघातील धनगर समाजाच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी 17 डिसेंबर पर्यंत करावी नसता 18 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे प्रदेश संपर्कप्रमुख रविकांत हारकळ, शहीद योगेश कारके वडील राधकीसन  कारके, रेणापूर येथील कृष्णा हारके, ड्रायव्हर युनियनचे विश्वनाथ साखरे आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी कुंडकर यांना लेखी निवेदन दिले. गोमेवाकडी  ता. सेलू जिल्‍हा परभणी येथील धनगर आरक्षणासाठी शहीद झालेल्या योगेश काररखे त्याच्या कुटुंबास शासनाने लेखी दिल्याप्रमाणे दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, एकास शासकीय सेवेत सामावून घ्यावे ,तसेच रेनापुर तालुका पाथरी येथील धनगर समाजाची स्मशानभूमी अतिक्रमणत हरवली असून ते शोधून देण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली .राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत परभणी जिल्ह्यात 102 या अंबुलन्स वर चालक म्हणून काम करणाऱ्या ड्रायव्हर युवकांना शासकीय सेवेत नियमित समावेश करून घ्यावे व त्यांचे मानधन 5000 वरून 15 हजार रुपये करावे अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली. 17 डिसेंबर पर्यंत या मागण्या मान्य न झाल्यास 18 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या निवेदनाच्या प्रती खा फौजिया खान, विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर ,आरोग्य मंत्री, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या