💥परभणी शहरातील भैय्यासाहेब आंबेडकर नगरात स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई...!

 


💥स्थागुशाच्या धाडसी कारवाईत १ लाख १७ हजार रुपयांचा गुटका साठा जप्त💥

परभणी (दि.१४ डिसेंबर) - शहरातील भैयासाहेब आंबेडकर नगर परिसरात आज सोमवार दि.१४ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करीत एका घरात साठवुन ठेवलेला तब्बल १ लाख १७ हजार रुपयांचा प्रतिबंधीत गुटक्याचा साठा जप्त केला.

परभणी जिल्ह्याचे कर्तव्यकठोर व शिस्तप्रिय जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी फौजदार साईनाथ पुयड, कर्मचारी हनुमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, बालासाहेब तुपसुंदरे, आशा सावंत, दिलावर खान, हरिचंद्र खुपसे, सय्यद मोबीन, पिराजी निळे हे सोमवारी शहरात गस्त घालत असताना त्यांना वांगी रस्त्यावरील भैय्यासाहेब आंबेडकर नगरातील एका व्यक्तीने घरात मोठ्या प्रमाणात गुटक्याचा साठा ठेवला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून फौजदार पुयड यांच्या या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे भैय्यासाहेब आंबेडकर नगरातील त्या घरावर छापा टाकला. त्यावेळी तेथे प्रतिबंधित गुटक्याचा मोठा साठा आढळला. कर्मचार्‍यांनी तेथे असलेल्या व्यक्तीची चौकशी केली असतात्याने अब्दूल हफीज अब्दूल हकीम असे नाव सांगत आपण पानटपरी चालवत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जिंतूर रस्त्यावरील एका व्यक्तीकडून सुगंधित तंबाखू खरेदी करत असल्याची माहितीही दिली, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास दिली. गुटक्याची मोजदाद केली त्यावेळी एक लाख सात रुपयांची सुगंधित तंबाखू गुटका आढळला. दहा हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ए१ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. हनुमंत जक्केवाड यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या