💥परभणी जिल्ह्यात आज शनिवारी आढळले ३४ कोरोना बाधित रुग्ण....!


💥जिल्ह्यात आज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोना बाधीताचा मृत्यू💥

परभणी (दि.५ डिसेंबर) - शहरासह जिल्ह्यात आज शनिवार दि.५ डिसेंबर २०२० रोजी ३४ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या २३ रुग्णांना आज सुट्टी देण्यात आली असून जिल्ह्यात आज एका कोरनाबाधित पुरूषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

कोविड कक्षात भरती एकून रुग्ण १६६ आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत २९० कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.तर जिल्ह्यात आजपर्यंत ७ हजार २५० कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून ६ हजार ७९४ कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या