💥पुर्णेचे नुतन उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड यांचा मनसे कडून सत्कार...!


💥सत्कार प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती💥 

 पुर्णा (दि.६ डिसेंबर) - पूर्णा पोलीस स्थानकाचे माजी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांची नुकतीच जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी पुर्णा तालुक्याच्या प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर नियुक्ती केली असून पुर्व उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वंभर जटाळे यांच्या नंतर प्रथमच उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर सुभाष राठोड यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने आज रविवार दि.६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी मनसे शेतकरी आघाडीचे नेते अनिल बुचाले तालुकाध्यक्ष गोविंद (राज) ठाकर,शहराध्यक्ष पंकज राठोड उपशहर अध्यक्ष शेख गौस,शहर सचिव राजेश यादव उपशहर अध्यक्ष पवन बोबडे मनविसे तालुका अध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते..... 

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या