💥धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस गुरूवार दि.२४ डिसेंबर २०२० पासून पुन्हा धावणार...!


💥प्रवासी संघटनांच्या जोरदार मागणीनंतर दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने दाखवला हिरवा कंदील💥

परभणी (दि.२२ डिसेंबर) - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने बंद केलेली 'धर्माबाद - मनमाड - धर्माबाद' या मार्गावर धावणारी मराठवाडा एक्स्प्रेस ही विशेष एक्स्प्रेस रेल्वे गुरुवार दि.२४ डिसेंबर २०२० पासून पुर्ववत धावणार आहे.दरम्यान, ऐन दिपावली सनावेळी बंद केलेली मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्वे प्रवाशांसह संघटनांच्या जोरदार मागणीनंतर दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनास सुरू करावी लागली.


 

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे विभागाने नांदे़ड ते पनवेल या एक्स्प्रेस पाठोपाठ मराठवाड्यातील रेल्वेप्रवाशांच्या सोयीकरिता धर्माबाद ते मनमाड व मनमाड ते धर्माबाद ही विशेष रेल्वे दिवाळीपुर्वी सुरू केली होती. मात्र, ऐन दिवाळीतच ती काही न सांगता प्रतिसाद नसल्याचे कारण देत अचानक बंद केली होती. मात्र, सर्वांच्याच पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासनास ती पुन्हा सुरू करावी लागली.

मराठवाडा एक्सप्रेस ही रेल्वे धर्माबाद रेल्वे स्थानकावरून सकाळी ०४-०० वाजता निघणार आहे. नांदेड स्थानकावर ०५-२८ वाजेच्या सुमारास तर पूर्णेत ०६-०३ वाजता परभणीत ०६-३८ वाजता,मानवतरोड ०६-५८ वाजता, सेलूत ०७-१७ वाजता परतूरला ०७-४४ वाजता,रांजनीला ०७-५४ वाजता,जालना ०८-४८ वाजता,बदनापूर ०९-०९ वाजता,मुकूंदवाडी ०९-४५ वाजता औरंगाबाद येथे ०९-५५ वाजता,लासूर येथे १०-३० वाजता,रोटेगाव ११-३० वाजता नगरसोल १२-२० वाजता,अंकई १२-४९ वाजता मनमाड रेल्वे स्थानकावर १-२० वाजेच्या सुमारास पोहोचणार आहे. 

परतीच्या प्रवासात धर्माबाद-मनमाड-धर्माबाद एक्सप्रेस मनमान येथून दुपारी ०३-०० वाजेच्या सुमारास निघणार असून अंकाई येथे दुपारी ०३-०० वाजता तर नगरसोलला दुपारी ०३-४० वाजता,रोटेगाव ०३-४९ वाजता,लासूर ०४-१९ वाजता,औरंगाबाद येथे ०५-५० वाजता,मुकूंदवाडीत ०६-११ वाजता,बदनापूर ०६-३६ वाजता,जालना ०६-५० वाजता,रांजनी ०७-१४ वाजता,परतूर ०७- २९ वाजता,सेलू ०७-५१ वाजता,मानवतरोड ०८-०४ वाजता,परभणी ०८-४३ वाजता,पूर्णा येथे ०९-३३ वाजता,नांदेड येथे १०-०८ वाजता,उमरी येथे ११-१० वाजता, तर धर्माबाद येथे रात्री १२-१० वाजेच्या सुमारास पोहोचणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने वेळा पत्रकासह घोषीत केले आहे...  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या