💥परभणी-नांदेड जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना भारतीय चलनातील १० रुपयांच्या नान्याचे वावडे का ?


💥रिजर्व्ह बँकेने चलनात आणलेली १० रुपयांची नानी चलनातून बाद होण्याच्या मार्गावर ? प्रशासनाने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे ?💥


परभणी (दि.९ डिसेंबर) - भारतीय रिझर्व्ह बँकेने सन २०१४ यावर्षी भारतीय नागरिकांच्या आर्थिक व्यवहाराच्या सोईसाठी चलनात आणलेल्या दहा रुपयांच्या नान्याची अवस्था अत्यंत दुर्दैवी झाली असून परभणी-नांदेडसह हिंगोली जिल्ह्यातील काही भागात या भारतीय चलनातील दहा रुपयांच्या नान्यावर काही बँकांसह व्यापाऱ्यांनी ही अघोषीत बंदी घातल्याचे निदर्शनास येत असून बँक प्रशासनासह व्यापारीही दहा रुपयांचे नाने स्विकारत नसल्यामुळे नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडत असून असंख्य नागरिकांकडे सदरील दहा रुपयांची नानी चलनातून बाद झाल्या प्रमाणे पडून असल्याने या दहा रुपयांच्या नान्याचे शेवटी करायचे तरी काय ? असा प्रश्न नागरिकांच्या मनात उत्पन्न होत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही छोटे मोठे व्यापारी दहा रुपयांचे नाने घेण्यास तयार नसल्याचे निदर्शनास येत असल्याने या दहा रुपयांच्या नान्यावर शासनाने खरोखरच बंदी घातली की काय ?असा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती परभणी-नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात ही निर्माण झाल्याने चिल्लरचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून तिनही जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाने दहा रुपयांच्या अघोषीत बंदी संदर्भात तात्काळ स्पष्टीकरण देऊन दहा रुपयांची नानी स्विकारण्या नकार देणाऱ्या बँक प्रशासनासह व्यापाऱ्यांवरही राजद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असे आदेश तात्काळ जारी करावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहै...

💥भारतीय रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण १० रुपयांच्या कुठल्याही नान्यावर बंदी नाही 💥 ..!


भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतीय चलनात १० रुपयांची तब्बल १४ प्रकारची नानी आणली असून यातील एकाही प्रकारच्या १० रुपयांच्या नान्यावर रिझर्व्ह बँकेने बंदी घातलेली नाही परंतु सदरील भारतीय चलनाचा गैरवापर करणाऱ्या नकली दागीने बनवणारे व या नान्याचा ब्लेडसाठी वापर करणाऱ्या कंपन्यांनी नान्यावर बंदी आल्याचा भ्रम तर निर्माण केला नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत असून भारतीय चलनातील या १० रुपयांच्या नान्याचा स्विकार करण्यास नकार देणाऱ्यांवर भारतीय मुद्रेचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हें दाखल करण्याचे निर्देश जारी केलेले आहेत.....

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या