💥पुर्णेचे डिवायएसपी श्री.सुभाष राठोड यांनी दैनिक 'सत्यलेख' वर्तमान पत्राच्या यशस्वी वाटचालीस दिल्या शुभेच्छा....!


💥दैनिक 'सत्यलेख' परिवाराच्या वतीने प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.राठोड यांचा सन्मान💥

पुर्णा (दि.४ डिसेंबर) - पुर्णेचे पुर्व उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले यांच्या बदली नंतर बरेच दिवसापासून रिक्त असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर जिल्ह्याचे कर्तव्यकठोर पोलिस अधिक्षक श्री.जयंत मिना यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजास गती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष व जेष्ठ पोलिस निरिक्षक श्री.सुभाष राठोड यांची नियुक्ती केली.


उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर श्री राठोड यांचा दैनिक 'सत्यलेख' परिवाराच्या वतीने तालुका प्रतिनिधी दिनेश चौधरी व ग्रामीणचे प्रतिनिधी रामा पारवे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्याचा सत्कार केला यावेळी त्यांना दैनिक 'सत्यलेख' वर्तमानपत्राचा अंकही भेट म्हणून देण्यात आला यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड यांनी वर्तमान पत्रावर एक दृष्टीक्षेप टाकून अल्पकालावधीत यशस्वीपणे वाटचाल करीत असल्याबद्दल दै.सत्यलेख वर्तमानपत्रासह संपादक अब्दुल हाफीज बागवान,कार्यकारी संपादक मकरंद बांगर,नांदेड आवृत्ती प्रमुख नरेश दंडवते,परभणी आवृत्ती प्रमुख मोहन धारासुरकर यांचेही कौतुक केले श्री.राठोड यांनी दैनिक सत्यलेख वर्तमान पत्राच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी बोलतांना श्री.राठोड यांनी दै.सत्यलेख वर्तमान पत्रातून निर्भीडपणे जनहीतवादी सत्यच लिखाण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली या सत्कारा वेळी पत्रकार संतोष पुरी,कोंडिबाभाऊ कदम आदी मान्यवर उपस्थित ....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या