💥पुर्णा नदीवरील जेकवेल मधील ७५ एचपी फुटबॉल असेंबली मध्ये तांत्रिक बिघाड; शहराचा पाणीपुरवठा खंडीत...!


💥शहरातील नागरिक राहणार तब्बल दहा दिवस पिण्याच्या पाण्यापासून वंचित💥 

पुर्णा (दि.२ डिसेंबर) - नगर परिषद पाणीपुरवठा विभागाच्या पुर्णा नदीवरील जेकवेल मधील ७५ एचपीची फुटबॉल असेंबली खराब झाल्याने सदरील असेंबलीच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा येणाऱ्या १० दिवसांपर्यंत खंडीत राहणार असून पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील सार्वजनिक हातपंच पुर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात आली असल्याने नागरिकांना पाण्याची कमतरता भासणार नाही याची पुरेपूर दक्षता नगर परिषद प्रशासन घेत आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील आणि नगराध्यक्षा श्रीमती गंगाबाई एकलारे उपनगराध्यक्ष विशाल कदम नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचे सभापती ॲड.राजेश भालेराव यांनी केले आहे....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या