💥महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मराठा सेवा संघाच्या वतिने करण्यात आले विनंम्र अभिवादन..!


💥यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती💥

सोनपेठ (प्रतिनीधी) :-सोनपेठ तालुका "मराठा सेवा संघ" व 32 कक्ष यांच्या वतीने दिनांक 6 डिसेंबर 2020 रोजी श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे परंमपुज्य बोधीसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त छोटे खानी विनंम्र अभिवादनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कदम, प्रमुख मार्गदर्शक परभणी जिल्हा दक्षता समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मा.प्रभाकरजी सिरसाट तसेच प्रमुख उपस्थिती संतोषजी निर्मळे तालुकाध्यक्ष केमिष्ट & ड्रगिष्ट असोसिएशन,संपादक किरण स्वामी,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंकुशराव परांडे सर, शहराध्यक्ष अमोल शिंदे, सुरेश भाऊ भोसले, लहुकुमार वाकणकर, प्रा.पंजाबराव सुरवसे सर, बालाजी इंगोले मामा, इखरा मित्र मंडळाचे अध्यक्ष सद्दाम हुसेन, प्रा पंजाबराव भोसले, अक्षय कदम, विजय राजभोज आणि बालासाहेब शिंदे यांच्या सह सर्व समाज बांधव उपस्थित होते.यावेळी सिरसाट साहेबांनी महापुरुषांचे विचार आणि समाजाला सध्या त्या विचारांची असलेली गरज, संविधानाचे महत्त्व, बौद्ध - मराठा आणि इतर समाज बांधवांचे सलोख्याचे कसे संबंध होते याबद्दल मोलाचे मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन शिवाजीराव कदम यांनी तर आभार आमोल शिंदे यांनी मानले.विषेश आभार श्री गुरु 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महारांजांचे जागा तात्काळ उपलब्ध करुन दिल्या बद्दल मानले.याप्रसंगी सहकार्य ओमप्रकाश स्वामी, रतीकांत स्वामी व कै.कन्या शाळेचे मुख्याध्यापक प्रदिप गायकवाड व प्रकाश तिरमले यांचे लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या