💥पालम पोलिस स्थानकाचे कर्तव्यनिष्ठ सपोनि.सचिन इंगेवाड यांच्या बदली मुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजगी...!


💥सपोनि.इंगेवाड यांची बदली तात्काळ रद्द करण्याची नागरिकांतून होत आहे मागणी💥

पालम (दि.१२ डिसेंबर) - तालुक्यातील पालम पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले सचिन इंगेवाड यांची बदली नियुक्ती पालम येथून नानलपेठ पोलिस स्टेशन परभणी येथे करण्यात आली असल्यामुळे पालम येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे

 अतिशय कर्तव्यदक्ष असलेले पोलीस प्रशासनामध्ये सर्व जनतेस न्याय मिळवून देणारे पत्रकार नागरिक व पालम तालुक्यातील सर्व जनतेचा विश्वास संपादन केलेले सचिन  इंगेवाड यांची बदली झाल्यामुळे सर्वस्तरातून नागरिकांचा नाराजीचा सूर उमटत असून. कर्तव्यदक्ष अधिकारी पालम तालुक्याला लाभले असताना अल्पावधीत त्यांची बदली होणे हे तालुक्याचे दुर्भाग्य असून त्याबद्दल सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात असून सपोनि.इंगेवाड यांची बदली तात्काळ रद्द करण्याची नागरिकांतून मागणी होत आहे... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या