💥परभणी जिल्ह्यातील जितूर तालुक्यातल्या आसेगावात मुलाच्या मृत्यूमुळे नैराश्यात असलेल्या पित्याने केली आत्महत्या...!


💥जिंतूर पोलिस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे💥

परभणी (दि.४ डिसेंबर) - जिल्ह्यातील जितूर तालूक्यातल्या आसेगावात मुलाच्या मृत्युमुळे नैराश्यात असलेल्या पित्याने काल गुरुवार दि.३ डिसेंबर २०२० रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथील संजय तुकाराम घोळवे वय ४२ वर्षे हे मागील काही दिवसापासून मुलगा विहिरीत बुडून मृत्यू पावल्यामुळे प्रचंड नैराश्यात होते. त्यातूनच त्यांनी गुरुवारी सकाळच्या सुमारास आसेगाव येथील शेतातील एका लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून संजय घोळवे यांनी आत्महत्या केल्याची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली. ग्रामस्थांनी ही माहिती पोलीसांत देताच जिंतूर पोलिस स्थानकाचे बिट जमादार धनंजय गायकवाड व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात शव दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कक्ष सेवक गंगाधर पालवे यांनी शवविच्छेदन केले असून या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून जिंतूर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. बीट जमादार धनंजय गायकवाड पुढील तपास करत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या