💥कोरोना काळात फड दाम्पत्याने आव्हानात्मक रुग्णसेवा केली -संतोष मैड

💥भक्तराम फड व सौ.संगिता फड कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित💥

परळी वैजनाथ (दि.७ डिसेंबर) :- मागील नऊ महिन्यापासुन कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असताना या काळात आरोग्य विभागातील कर्मचार्यांनी जीवाची पर्वा न करता सेवा बजावली अशा या आरोग्य कर्मचार्यापैकी परळी तालुक्यातील भक्तराम फड व सौ.संगिता फड या दाम्पत्याने पुणे येथे आव्हानात्मक आरोग सेवा बजावून सामाजीक बांधिलकी जोपासली असल्याचे संतोष मैड यांनी सांगितले.

          परळी तालुक्यातील भोजनकवाडी या गावातील रहिवासी असलेले भक्तराम फड व त्यांच्या पत्नी सौ.संगिता फड या पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात आरोग्य सेवा बजावत आहेत.मध्यंतरी कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर त्यांनी सलग 12 तास पीपीई किट घालुन सातत्याने आरोग्य सेवा केली त्यांच्या या कार्याबद्दल  राधा मोहन प्रतिष्ठान,दै.मराठवाडा साथी व गती मल्टीसव्हीर्ससकडुन च्या वतिने संतोष मैड यांच्या हस्ते कोरोना योध्दा म्हणून सन्मानपञ देवुन  गौरवण्यात आले यावेळी सचिन भांडे आदी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या