💥परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातल्या बोरीत विशेष पथकाची धाडसी कारवाई १६४ पोते रेशनचा तांदूळ पकडला...!

 


💥विशेष पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत १ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात💥

परभणी (दि.१० डिसेंबर) - जिल्ह्यातील  जिंतूर तालुक्यातील बोरी पोलिस स्थानकाच्या हद्दीतील बोरी शहरातील श्रीनिवास नगरातील गोपाळ झंवर यांच्या कॉम्प्लेक्स मधील शेख जवरोद्दीन यांच्या गाळ्यावर काल बुधवार दि.९ डिसेंबर २०२० रोजी सायं.५-३० वाजेच्या सुमारास विशेष पथकाचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार व विश्वास खोले यांच्यासह पथकातील सहकारी पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे,नीलेश भुजबळ,यशवंत वाघमारे,राहूल चिंचाने,शंकर गायकवाड़,अजहर पटेल,विष्णु भिसे,दिपक मुदिराज यांनी धाड टाकून शासकीय स्वस्त धान्य वाटप प्रणाली मधील १६४ पोते तांदळाचा साठा किंमत १ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्याची धाडसी कारवाई केली सदरील शासकीय स्वस्त धान्य प्रणाली तांदळाचा साठा शासकीय पोत्यातून बाजारी पोत्यात टाकून काळ्याबाजारात विकण्यासाठी साठवून ठेवण्यात आला होता.या संदर्भात विशेष पथकाला गुप्त माहिती दाराकडून माहिती मिळताच पथकाने जिल्ह्याचे कर्तव्यकठोर पोलिस अधिक्षक श्री जयंत मिना आदेशा प्रमाणे व अप्पर पोलिस अधिक्षक श्री.मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी धाडसी कारवाई करीत शासकीय स्वस्त धान्याचा काळा कारभारी शेख जवरोद्दीन शेख बशीरोद्दीन वय वर्षे ४८ रा.श्रीनिवास,नगर बोरी याच्यासह पंचा समक्ष १ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्याची धाडसी कारवाई करीत बोरी पोलिस स्थानकात नमूद आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून विशेष पथकाने केलेल्या या धाडसी कारवाई बद्दल विशेष पथकातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीणा आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री मुमका सुदर्शन यानी अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या