💥परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथील एका गोदामावर विशेष पथकाची धाड...!


💥विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत शासकीय स्वस्त धान्यातील १३४ पोते तांदूळ जप्त💥 

परभणी (दि.२ डिसेंबर) - जिल्ह्यातल्या जिंतूर तालूक्यातील भोगाव देवी येथील एका खाजगी गोदामात काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेला शासकीय स्वस्त धान्यातील गोरगरीबांच्या तोंडातील घास असलेला तब्बल १३४ पोते तांदूळ जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी जिल्ह्यातील अवैधंद्यांचे साम्राज्य उध्वस्त करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकाने काल सोमवारी दि.१ डिसेंबर २०२० रोजी जप्त केल्याने शासकीय स्वस्त धान्याचा काळाकारभार करणाऱ्यांचे अक्षरशः धाबे दणाणले असून जिंतूर पोलिसांनी महसूल विभागास जप्त केलेल्या तांदळा बाबत माहिती दिली असून त्यांच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

विशेष पथकाचे कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार व विश्वास खोले यांना जिंतूर तालु्क्यातील भोगावदेवी येथे स्वस्तधान्य दुकानातील धान्याची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या आदेशाने व अप्पर पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक पवार व खोले यांच्यासह कर्मचारी सुग्रीव केंद्रे,राहूल चिंचाणे, यशवंत वाघमारे, दिपक मुदिराज यांच्यासह जिंतूर पोलिस स्थानकातील कर्मचारी अनिल हिंगोले, राजेश बाबर पाटील आदींनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर भोगावदेवी येथील गावाबाहेरील शासकीय स्वस्त धान्य दुकान असलेल्या एका पत्राच्या गोदामात छापा टाकला असता त्यावेळी तेथे १३४ पोत्यांसह मोहसीन कुरेशी हा देखील त्या ठिकाणी आढळून आला यावेळी पोत्यांची तपासणी केली असता त्यात तांदूळ असल्याचे निदर्शनास आले. काळ्या बाजारात तांदूळ विक्री करण्याच्या उद्देशानेच तो हा तांदूळ बाळगत असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. त्यास पथकाने ताब्यात घेतले आहे. जिंतूर पोलिस स्थानकात याबाबात विशेष पथकाने माहिती दिली असून पुढील कारवाई जिंतूर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

दरम्यान, भोगाव देवी येथील तो गोडाऊन सील करण्यात आला असून महसूल प्रशासनास तांदळाबाबत माहिती देण्यात आली आहे. महसूल प्रशासनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिंतूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी दिलासाशी बोलताना दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या