💥परभणी जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी एस.टी. टाकसाळे यांनी स्विकारला पदाचा पदभार.....!


💥मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज यांना देण्यात आला निरोप💥

परभणी (दि.९ डिसेंबर) - परभणी जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी एस.टी.टाकसाळे यांनी आज बुधवार दि.९ डिसेंबर २०२० रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.दरम्यान, मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांना आज बुधवारी जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांच्याकडून आयोजित सत्कार कार्यक्रमातुन निरोप देण्यात आला.


यावेळी उपमुख्य कार्यकारी मंजुषा कापसे यांच्यासह अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी श्री. पृथ्वीराज यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेत करण्यात आलेल्या कामांचा उल्लेख करतानाच त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल, त्यांच्या शिस्तीबद्दलही कौतुक व्यक्त केले.

यावेळी आजी-माजी पदाधिकार्‍यांसह सदस्य, जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या