💥बिड जिल्ह्यात केज-बिड रोडवर भिषण अपघात; अपघातात ३ जण ठार...!


💥सारुळ पाटीवर कार व मोटारसायकल मध्ये झाला भीषण अपघात💥

बिड (दि.२२ डिसेंबर) जिल्ह्यातील केज बीड रोडवर आज मंगळवार दि.२२ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ०३-०० वाजेच्या दरम्यान कार व मोटारसायकल मध्ये झालेल्या अपघातात तिघे ठार झाल्याचे वृत्त आहे. सदरील अपघात नेमका कसा झाला ? हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मयत हे अप्पाराव बापूराव ढाकणे वय ८०, सुंदर नामदेव ढाकणे वय ५३, बहादूर राजाभाऊ पुरी वय ४८ रा.सारुळ येथील असल्याची माहिती मिळत आहे. सदरील जखमींना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान एकाचा मृत्यू झाला असून अन्य दोघा जखमींना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई ला पाठवण्यात आल्याची माहिती अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी दिली. मात्र अंबाजोगाई ला पाठवण्यात आलेल्या दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या