💥नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मुकबधिर मतिमंद मुलीची बलात्कार करून निर्घृण हत्या...!


💥मानवहीत लोकशाही पार्टीने घटनेचा तिव्र शब्दात निषेध करून घटनेतील नराधमांना तात्काळ फाशी देण्याची केली मागणी💥 

परभणी दि.१६ डिसेंबर) - नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मुकबधिर व मतिमंद मुलीवर नराधमाकडून बलात्कार करून तिचा दगडाने ठेचून खून केल्याची दुर्दैवी घटना दि.९ डिसेंबर २०२० रोजी घडली होती या दुर्दैवी घटनेतील आरोपीस तात्काळ अटक करून शक्ती कायद्यांतर्गत फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालून तात्काळ आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात देण्याची मागणी आज बुधवार दि.१६ डिसेंबर २०२० रोजी मानवहीत लोकशाही पार्टीच्या वतीने तहसिलदार पल्लवी मेटकर यांच्या मार्फत एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना करण्यात आली आहे.


मानवहीत लोकशाही पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मंगळवारी पुर्णेच्या तहसिलदार मेटकर यांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील कुमारी सुनिता कुडके या साठे नगर भागात राहणाऱ्या अनुसूचित जातीतील मातंग समाजाच्या मूकबधिर व मतिमंद मुलीवर येथील तीन ते चार नराधमांनी अमानुषपणे बलात्कार करून तिचा पुरावा नष्ट करण्यासाठी दगडांनी ठेचून खून केल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत मानवहीत लोकशाही पार्टीच्या वतीने तहसिरांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन पाठवले या निवेदना असे नमूद करण्यात आले आहे की सदरील घटना पुरोगामी महाराष्ट्राला व माणुसकीला काळिमा फासणारी असून या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून शक्ती कायद्या अंतर्गत फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी व पीडित मुलीच्या कुटुंबास न्याय देण्यात असेही निवेदना नमूद करण्यात आले असून या निवेदनावर या निवेदनावर मानवहीत लोकशाही पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड,मोहन आडबाल,मारोतराव रणखांबे,कपिल गायकवाड,आकाश गायकवाड,अविनाश गायकवाड आदींच्या स्वाक्षरी आहेत..टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या