💥परभणी शहरातील वांगीरोड परिसरात कालव्यात पाय धुण्यास गेलेली एक व्यक्ती गेली कालव्याच्या पाण्यात वाहून...!


💥कालव्यात वाहुन गेलेल्या व्यक्तीची शोधाशोध सुरू💥

परभणी (दि.१५ डिसेंबर) - जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात आज मंगळवार दि.१५ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ३-०० वाजेच्या सुमारास पाण्यात पाय धुन्यासाठी उतरलेली एक व्यक्ती प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना शहरातील वांगीरोड परिसरात घडली.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी प्रकल्प १००% भरलेला आहे.रब्बी हंगामातील पिकांना पाणी पाळ्या देण्यासाठी जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कालवा पाण्याने तुडूंब भरून वाहत आहे. कालव्यात परिसरातील काही युवक पोहण्यासाठी पाण्यात नेहमीच उतरत असतात.आज मंगळवारी दुपारी वांगीरोडवरील एक व्यक्ती कालव्यात पाय धुन्यासाठी म्हणून उतरली मात्र संबंधित व्यक्तीचा तोल जाऊन तो पाण्यात पडला.पाण्यातून वर न आल्याने तेथे असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली. मात्र, पाण्यास वाहता प्रवाहा असल्याने ती व्यक्ती वाहून गेली. आशीर्वादनगरातील दुर्गादेवी मंदिराजवळील गेटवर नागरिकांनी त्या व्यक्तीची शोधाशोध केली. परंतु तेथेही सापडली नाही. पाण्यासोबत आणखी पुढे वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या