💥पुर्णा तालुक्यातील चुडावा येथील काँग्रेस पक्षाचे कार्यकते तथा पत्रकार विनायक देसाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर....!


💥 प्रदेश उपाध्यक्ष मा.खा.सुरेश जाधव यांची घेतली भेट; प्रदेश उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल जाधव यांचा केला सत्कार💥

पुर्णा (दि.२२ डिसेंबर) - तालुका युवक काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार विनायक आबाजी देसाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटवर असून आज मंगळवार दि.२२ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ०४-०० वाजेच्या सुमारास त्यांनी पालम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.खासदार सुरेश जाधव यांची भेट घेतली यावेळी त्यांनी माजी खा.जाधव यांची प्रदेश उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

पुर्णा तालुका युवक काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पद भुषवलेले विनायक देसाई हे वसमत पंचायत समितीचे तब्बल पंचवीस वर्षे सभापती पदासह पंचवीस वर्षे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पद भुषवलेले स्व.आबाजी नारायनजी देसाई यांचे सुपूत्र असून त्यांनी आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुरेश जाधव यांची भेट घेतल्याने ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात असून या भेटी वेळी त्यांच्या सोबत  पत्रकार चंद्रकांत शेळके,गुणाजी राव मोहिते आदी मान्यवर उपस्थित.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या