💥पुर्णा तालुक्यातील देऊळगाव-मुंबर पांदण रस्त्यांची कामे अपूर्णच; शेतकरी त्रस्त...!


💥जिल्ह्यातून जांबुळबेटावर येणाऱ्या पर्यटकांनाही या रस्त्यावरून जातांता प्रचंड त्रास सहन करावा लागतो💥

ताडकळस (दि.१५ डिसेंबर) पालकमंत्री पांदन रस्ते योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या तीन किमी अंतराचा देऊळगाव ते मुंबर पांदण रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे शेतकरी ग्रामस्थांना अनेक  समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत दिनांक 14 डिसेंबर रोजी पूर्णा येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी सचिन तुकाराम शिंदे प्रताप संभाजी शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

💥मजबूत असा पांदण रस्ता नसल्याने  शेतकऱ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे💥



प्रत्येक शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजना राबविण्यात येते. याकरिता जिल्ह्यातील ग्राम पंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समितीने हे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले.

 यापैकी अर्ध्यापेक्षा अधिक रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. शेत, पाणंद रस्ते हे शेतकऱ्याच्या  दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. हे रस्ते  झाल्यास गोदावरी नदीच्या मध्यभागी असलेल्या जांभुळबेट यांना भेटी देण्यासाठी पर्यटक जिल्हाभरातून येतात पण रस्त्या अभावी जांभुळबेट कडे जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास पर्यटकांचा व शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा होईल शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी सोपे होईल  रस्त्या अभावी शेतातील माल घरी आणण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे या राहिलेल्या रस्त्याचे मातीकाम करून शेतकऱ्यांना रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय थांबेल. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांसाठी संबंधित विभागांनी मिशन मोडवर काम करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिल्या होत्या. तथापि, अर्धी अधिक कामे अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाताना गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. पांदण रस्त्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


*********************************************

💥जिल्ह्यातून जांबुळबेटावर येणाऱ्या पर्यटकांनाही या रस्त्यावरून जातांता प्रचंड त्रास सहन करावा लागतो💥 


गोदावरी नदीच्या अगदी मधोमध वसलेले हे छोटेस जांभूळ बेट पण रस्त्या अभावी पर्यटकांना जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. देऊळगाव ते मुंबर या पांदण रस्त्यावरून  काही अंतरावरच ते जांभूळ बेट आहे जिल्हाभरातून पर्यटक जांभूळ 

बेटाला भेटी देण्यासाठी येतात पण या रस्त्याचे काम अपूर्णच असल्यामुळे पर्यटकांना जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे या रस्त्याच्या अडचणीमुळे पर्यटक व शेतकरी यांच्यात  नाराजीचा सूर उमटत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या