💥परभणी जिल्हा सायबर सेलच्या तांत्रिक तपासामुळे घरफोडीतील अट्टल गुन्हेगार जेरबंद...!


💥पोलिस प्रशासनाने ताब्यात घेतलेला गुन्हेगार वेगवेगळ्या राज्यात फिरणारा💥

परभणी (दि.१५ डिसेंबर) परभणी जिल्हा पोलिस दलातील सायबर सेल विभागातील धाडसी कर्मचार्‍यांनी अत्यंत सखोल तांत्रिक तपास करत घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार निष्पन्न करीत संबंधित गुन्हेगारास ताब्यात घेण्यास मदत केली आहे.परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथे राम आडे यांच्यासह अन्य एकाच्या घरी २४ ऑगस्ट २०२० रोजी घरफोडी झाली होती या घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला होता. या प्रकरणी गंगाखेड पोलिस स्थानकात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंगाखेड पोलिस तपास करत असतानाच जिल्ह्याचे अत्यंत कर्तव्यकठोर पोलिस अधीक्षक जयंत मीना व अतिरीक्त पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर विभागातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, कर्मचारी गणेश कौटकर व राजेश आगाशे हेही तांत्रिक तपास करत आरोपीचा शोध घेत होते. श्री.कौटकर व राजेश आगाशे यांनी केलेल्या तंत्रशूध्द तांत्रिक तपसास यश आले. त्यांनी या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले. त्यानंतर त्याची माहितीही काढण्यात सायबर विभाग यशस्वी झाला. त्यावेळी संबंधित चोरटे हे सतत वेगवेगळ्या राज्यात फिरतीवर असतात. याच दरम्यान सायबरचे श्री. कौटकर व आगाशे यांनी निष्पन्न केलेल्यापैकी एक जण हिंगोली येथे आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून सायबरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. बाचेवाड यांनी हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार श्री.घेवारे यांच्या मदतीने संबंधित आरोपीस ताब्यात घेतले. संबंधित चोरट्यास गंगाखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या