💥परभणी जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक जिल्ह्यातील खोट्या गुन्ह्यांची मालिका रोखण्याच्या दिशेने कठोर पावल उचलतील काय ?

 


💥आरोपीं प्रमाणेच फिर्यादीच्या आरोपांतील सत्यतेची फेर तपासणी करणार मोबाईल क्रमांकावरील संभाषण💥 

💥शोध आणि बोध - चौधरी दिनेश


परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील सर्वसामान्य जनता अत्यंत संयमी कायद्याचा सन्मान करणारी तसेच धर्मनिरपेक्षता जोपासणारी जरी असली तरीही सर्वसामान्य जनतेसह प्रतिष्ठित नागरिक कर्तव्यकठोर अधिकारी कर्मचारी व जनहीतवादी पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचेही मानसिक खच्चीकरण करणारे 'व्हाईट कॉलर मनुष्यरुपी नराधम' जे स्वतःच्या स्वार्थापोटी गुन्हेगारी प्रवृत्तींसह अवैध व्यवसायांच्या साम्राज्याला आपल्या पद आणि प्रतिष्ठेच्या बळावर खंबीर बळकटी देऊन माफीयाशाही गुंडशाहीशी आर्थिक हितसंबंध जोपासत सर्वसामान्य जनतेसह कर्तव्यदक्ष शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याच्या उद्देशाने किरकोळ आपसी वादासह सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या किरकोळ वादाला खतपाणी घालत दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण करून दोन भिन्नभिन्न समाजातील तरुणांना चिथावणी देत दंगलीचे स्वरूप देण्याचा व सातत्याने प्रशासनाला वेठीस धरण्याचा गंभीर प्रकार पडद्या मागील अस्सल राजकीय समाजकंठक करीत असल्याने संपूर्ण पुर्णा तालुका सातत्याने दहशतीखाली वावरतांना पाहावयास मिळत असून या राजकीय पद आणि प्रतिष्ठेची स्वतःच्या अवैध धंद्यांना ढाल बनवून निरपराध तरुणांना गुन्हेगार बनवत असंख्य कुटुंबांना उध्वस्त करणाऱ्या पडद्यामागील अवैध धंदेचालक 'व्हाईट कॉलर' तथाकथित निम हकीम राजकीय दहशतवाद्यांचा विमोड करण्यासाठी एखादा अवतारी पुरूषाचे जिल्ह्यात आगमन झाल्या प्रमाणे परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.जयंत मिना यांनी स्विकारल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात दहशतमुक्त वातावरणास सुरूवात झाल्याचे निदर्शनास येत असले तरीही पुर्णा तालुक्यातील पडद्या मागील व्हाईट कॉलर खादीतील समाजकंठकांसह अवैध व्यवसायांतील माफीया गुंडांच्या बुडातील खुनसी बुडबूडा अद्यापही फुटला नसल्याने या बुडबुड्याचा अग्नीकोंब होतांना दिसत असून या अवैध धंद्यांच्या साम्राज्यातील गटारात वळवळणाऱ्या गलिच्छ शेपटी आळ्यांच्या इशाऱ्यावर समाजातील समाजकंठक प्रवृत्तींकडून सुडसत्रातून दाखल गंभीर गुन्ह्यांमुळे निरपराध तरुणांचे भविष्य उध्वस्त करण्याचा सातत्याने प्रयत्न चालतच असल्याचे निदर्शनास येत असून शहरातील विविध भागात असो की ग्रामीण भागात किरकोळ वाद जरी झाला तरी त्या वादाला भयंकर अश्या वादाचे स्वरूप देऊन पोलिस प्रशासनावर दबावतंत्रांचा वापर करीत निरपराधांना गुन्ह्यात अडकवायचे आणि गुन्हेगाराला गंभीर गुन्ह्यातून सहज कसे सोडवायचे या कुटील कारस्थानांना सुरूवात होत असल्याने पोलिस प्रशासनही अनेक वेळा हतबल झाल्याचे पाहावयास मिळत असून एखादा फिर्यादी फिर्याद देते वेळी खरच सत्य बोलतोय की त्याला कोणीतरी पडद्यामागील कळीचा नारद खोटी फिर्याद देण्यास प्रोत्साहन देतोय या गोष्टीची सत्यता पडताळण्यासाठी जिल्हा पोलिस दलाला आता 'सायबर सेल' सतर्क करण्याची अत्यंत आवश्यकता असून अश्या खोट्या गुन्ह्यांची मालिका आता कुठेतरी रोखण्याचे व निरपराधांना गुन्हेगार बनवून त्या अर्धवट गुन्हेगारांच्या पाठबळावर स्वतःची राजकीय कारकीर्द तयार करून त्या कारकीर्दीच्या आड अवैध धंद्याचे साम्राज्य स्थापीत करणाऱ्या पडद्यामागील 'व्हाईट कॉलर' समाजकंठकांना रोखण्याचे गंभीर आवाहन पोलिस दलासमोर निर्माण झाले असल्याने आता त्या आवाहनाला खंबीरपणे तोंड देण्याची क्षमता असलेले श्री.जयंत मिना यांच्यासारखे जिल्हा पोलिस अधिक्षक जिल्ह्याला लाभल्याचे निदर्शनास येत असून ज्या प्रमाणे गुन्हेगारांसह गुन्हेगारीचा व अवैध धंद्याचे साम्राज्य उध्वस्त करण्याची क्षमता या अस्सल जिवणातील सिंघम अधिकाऱ्यात आहे त्याच पध्दतीने निरपराधांना अपराधी बनवून स्वतःचे हलकट राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा व टिकवण्याचा केविलवाना प्रयत्न करणाऱ्या पडद्यामागील 'व्हाईट कॉलर' समाजकंठकांना लगाम लावण्याची क्षमताही श्री.मिना यांच्यात आहेच यात तिळमात्र शंका नाही.

💥पुर्णा शहर हळुवारपणे बनत आहे राजकीय वरदहस्त प्राप्त 'माफियाशाहीचे' केंद्र💥 


राजकीय पद प्रतिष्ठेच्या आड दडून अवैध धंद्यांचा काळाकारभार सोईस्कररित्या चालवण्यासाठी सर्वसामान्य घरातील तरुणांना आपल्या हातातील कळसुत्री बाहुल्या बनवण्यासाठी शहरातील  मद्यपींसह चोऱ्या फसवणूक तसेच सोन्या-चांदीच्या चोरीच्या मालाची खरेदी विक्री करून चोरीच्या गुन्ह्यांना प्रोत्साहन देणारे,अवैध गौण-खनिज रेतीची तस्करी करणारे,अवैध देशी-विदेशी दारूची तस्करी करणारे,अवैध गुटखा,अवैध गोवंश-गोमांसाची तस्करी करणारे,शासकीय धान्याची तस्करी करणारे,गांजा नशिल्या पदार्थांची तस्करी करणारे,भुखंड माफीया असामाजिक तत्वांना हाताशी धरून अवैध धंद्यांना विरोध करणाऱ्या तसेच विरोधात लिखाण करणाऱ्यांच्या विरोधात खोट्या गुन्ह्यांचे बोधट शस्त्र उगारून मानसिक खच्चीकरण करण्याचे गंभीर प्रकारही आता समोर येतांना पाहावयास मिळत असून शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांतून मिळणाऱ्या प्रचंड कमाईतून सैताडलेली माफियाशाही आता सर्वसामान्य जनतेचा घात करून तरुण पिढीचे संपूर्ण भविष्य उध्वस्त करू पाहत आहे.

💥कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरण्यासाठी व विरोधात जाणाऱ्या विरोधकांच्या समर्थकांना संपवण्यासाठीच दंगलीचे अस्त्र💥


शहरात कुठेही आपआपसात किंवा तरूणांच्या दोन गटात एखाद्या किरकोळ वादाची घटना झाली की त्या वादात जाणीवपूर्वक हस्तक्षेप करून आगीत तेल ओतन्याचे काम सोईस्कररित्या करीत आरोपींसह फिर्यादीला जात-धर्म लावून त्या किरकोळ वादाचे भयंकर वादात रुपांतर करण्याची अनोखी पध्दत म्हणजेच 'पुर्णेतील दंगल' अश्या दंगलींना सुरूवात सन २०१४ पासून झाली पानपट्टीवर चुण्याची डब्बी घेण्याच्या किरकोळ वादावरून झालेली दंगल व त्यानंतरची दगडफेक म्हणजेच राजकीय सुडसत्रासह प्रशासन व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा झालेला निच प्रकार यानंतर शहरात सन २०१६ यावर्षी दोन दंगली झाल्या यात १९ जानेवारी २०१६ रोजी शहरातील आनंद नगर परिसरात मोटरसायकलचा किरकोळ धक्का लागले वरून दोन भिन्नभिन्न समिजातील तरूणांची माथी भडकवून दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण करून दहशत माजवण्याचा प्रकार यानंतर २७ एप्रिल २०१६ रोजी तालुक्यातील मौ.कात्नेश्वर येथे महापुरूष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणूकीवर दगडफेक करीत जातीय दंगल पसरवण्याचा प्रयत्न तर १४ एप्रिल २०१७ रोजी शहरातील महादेव मंदिर परिसरात महापुरूष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणूकीवर झालेल्या दगडफेकीनंतर उसळलेली दंगल यातून झालेली भयंकर जाळपोळ या दंगलींचा सखोल अभ्यास केल्यास असे निदर्शनास येते प्रत्येक दंगलीनंतर दंगलीचे खरे सुत्रधार व समाजकंठक मोकळे राहतात परंतु ज्यांचा दंगलीशी अर्थाअर्थी कुठलाच संबंध नसतो अश्या निरपराध तरूणांच्या दंगल करणारे दंगलखोर म्हणून याद्या तयार केल्या जातात आणि आपण कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाला किती सहकार्य करतो असे भासवण्याचा प्रयत्न दस्तूरखुद पडद्या मागील दंगलीच्या 'व्हाईट कॉलर' सुत्रधारांकडूनच केला जातो या कुटील डावात प्रशासनातील काही खाल्ल्या ताटाला जागणारे भ्रष्ट अधिकारी किंवा कर्मचारीही महत्वाची भुमिका बजावतात असे म्हणने यत्किंचितही चुकीचे ठरणार नाही.

शहरात दोन वर्षापूर्वी  दि.२५ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी ०२-३० वाजेच्या सुमारास एका राजकीय पुढाऱ्याच्या इन्होवा कारचा एका सायकल वरून शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलीला धक्का लागल्याच्या कारणामुळे प्रथमच एका राजकीय पुढाऱ्यामुळे दंगल घडल्याचा गंभीर प्रकार समोर आला सदरील 'इन्होवा कार' उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक हाजी कुरेशी यांची असल्याने जाब विचारण्यास गेलेल्या काही ग्रामीण भागातील तरूणांमध्ये व नगरसेवक कुरेशी व त्यांच्या गाडीवरील चालक यांच्यात तुंबळ हाणामारी झाली आणी पाहता पाहता शहारातील पडद्यामागील समाजकंठकांच्या ठराविक परंपरे प्रमाणे समर्थकांकडून झालेली दगडफेक तोडफोडीला सुरूवात सर्वसामान्य जनतेला व प्रशासनाला वेठीस धरण्याचाच प्रकार म्हणावा लागेल ना ? समाजकंठकांनी शहराबाहेरील घटनेचे पडसाद शहरातही उमटवण्यास सुरूवात केली लोकमान्य टिळकरोड परिसरात दोन्ही बाजूंनी दगडांचा जोरदार वर्षाव तब्बल विस पंचवीस मिनिटे सुरू होता यानंतर पोलिस प्रशासन कमालीचे सतर्क झाले तत्कालीन जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.कृष्णकांत उपाध्याय यांनी घटनास्थळ परिसरातील सिसीटिव्ही पुटेजची तपासणी करीत एकतर्फी १९ लोकांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ व महाराष्ट्र संघटीत नियंत्रण नियम १९९९ (मोका) कायद्या अंतर्गत कारवाई केली खरी परंतु या घटने नंतर शहरात खुलेआम काठ्या घेऊन दहशत माजवीत प्रचंड प्रमाणात दगडफेक करणाऱ्या समाजकंठकांसह पडद्यामागील दंगलीचे सुत्रधार मात्र नेहमी प्रमाणे कायद्याच्या कचाट्यातून सुटले असे म्हणने चुकीचे ठरणार नाही.....

💥गुन्ह्यांच्या तपासात सायबर सेलची भुमिका महत्वाची; आरोपींसह फिर्यादींच्या मोबाईलचीही करावी तपासणी💥 


 

प्रत्येक घडलेल्या गुन्ह्यातील सत्यतेची पडताळनी करण्यासाठी जिल्ह्याचे कर्तव्यकठोर पोलिस अधिक्षक श्री.जयंत मिना यांनी घटनेतील आरोपीं प्रमाणेच फिर्यादीच्याही मोबाईल क्रमांकाची सायबर सेल मार्फत तपासणी केल्यास एकतर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल आणि घटनेतील सत्यताही निश्चितच बाहेर येईल फिर्यादी हा खरोखरच घडलेल्या घटने संदर्भात फिर्याद देत आहे की एखाद्या पडद्यामागून सुत्र हलवणाऱ्या 'व्हाईट कॉलर' माफीया गुंडाच्या इशाऱ्यावरून दाखल करतोय की निरपराधाला अपराधी बनवण्याचे षडयंत्र रचणाऱ्या एखाद्या समाजकंठक राजकारण्याच्या सांगण्यावरून याचा निश्चितच उलगडा होईल..... टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या