💥पुर्णा तालुक्यात अवैध चोरट्या रेती तस्करीला महसुल प्रशासनातील 'झारीतील शुक्राचाऱ्यांचा' हिरवा कंदील ?

 


💥तालुक्यातील पिंपळगाव फाट्यावर विशेष पथकाने पकडला ३ ब्रास रेतीसह टिप्पर एकून १० लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त💥

पुर्णा (दि.१८ डिसेंबर) - तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रावर  अक्षरशः लचके तोडणाऱ्या रेती तस्कर रुपी गिधाडांच्या झुंडी तुटून पडल्या असतांना महसुल प्रशासनात कार्यरत झारीतील शुक्राचार्य मात्र आपल्या कर्तव्याशी दगलबाजी करीत अवैध चोरट्या रेतीची तस्करी करीत शासकीय संपत्तीची लुटमार करणाऱ्या गिधाडांच्या पंगतीला बसून शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या गौण-खनिज संपत्तीची सोईस्कररित्या विल्हेवाट लावत रेती तस्करांच्या दावणीला आपली नितिमत्ता पावनी बनवून बांधत असल्यामुळे ठराविक रेती धक्यांच्या लिलावा पुर्वीच त्या धक्यांची अक्षरशः खरडन झाल्यानंतर पुन्हा बेकायदेशीर नवीन धक्यांची निर्मिती करून पुर्णा-गोदावरी नदीपात्रांतील रेतीवर रेती तस्करांच्या टोळ्या रात्री अपरात्री तुटून पडतांना पाहावयास मिळत असुन असाच प्रकार आज शुक्रवार दि.१८ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ०४-१० वाजेच्या सुमारास उघडकीस आला विशेष पथकाचे सहाय्यक उपनिरिक्षक चंद्रकांत पवार,सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विश्वास खोले,पोलिस कर्मचा सुग्रीव केंद्रे,पोना.यशवंत वाघमारे,निलेश भुजबळ,पोना.राहूल चिंचाणे,शंकर गायकवाड,जमीर फारूखी,अजहर पटेल,विष्णू भिसे,गणेश कोटकर दिपक मुदीराज हे जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक जयंत मिना यांच्या आदेशाने पुर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या उद्देशाने पेट्रोलींग करीत असतांना झिरोफाटा-पुर्णा मार्गावर पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की लक्ष्मीनगर गावाकडून केनॉलच्या मार्गाने अवैध चोरटी वाळू भरलेला टिप्पर क्र.एमएच-२२ एन १२९९ हा पुर्णेकडे विक्री करण्याच्या उद्देशाने येत आहे यावेळी  विशेष पथकाने सदरील टिप्पर अडवला यावेळी पथक टिप्पर पर्यंत जाण्या अगोदरच टिप्पर चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला यावेळी पथकाने अवैध चोरट्या वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्परसह एकून १० लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पथकातील पोना.यशवंत वाघमारे यांनी पुर्णा पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात टिप्पर चालकासह मालका विरोधात कलम ३७९,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या