💥परभणी येथील त्रिमुर्ती नगर परिसरात पत्ता विचारण्याचा बहाणा करीत भामट्याने पळवली दीडतोळ्याची सोन्याची साखळी...!


💥घटनेमुळे त्रिमुर्तीनगर परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे💥

परभणी (दि.४ डिसेंबर) - शहरातील त्रिमुर्ती नगर परिसरात पत्ता विचारण्याचा बहाणा करीत एका नागरिकाच्या गळयातील तब्बल  दिड तोळ्याची सोन्याची साखळी अज्ञात भामट्याने पळवल्याची घटना आज शुक्रवार दि.४ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ०२-३० वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्रिमूर्तीनगरातील नागरिक जोशी हे आज शुक्रवारी घरासमोर उभे होते. त्यावेळी दुचाकीवर दोन अज्ञात व्यक्ती तेथे आले. त्यातील एक व्यक्ती गाडीवर बसून होता.तर सोबतच्या दुसर्‍या एकाने त्यांच्याशी पत्ता विचारण्याचा बहाणा करीत जोशी यांचे लक्ष विचलीत करून  त्यांच्या गळ्यातील दिड तोळ्याच्या (१५ ग्राम) वजनाची सोन्याची साखळी हातो हात लंपास केली. अनपेक्षित घडलेल्या या प्रकाराने श्री. जोशी भांबावून गेले. आरडाओरड केली परंतू ते दोघेही सोनसाखळी चोर भरधाव वेगाने फरार झाले. त्यानंतर श्री.जोशी यांनी नानलपेठ पोलिसांशी संपर्क केला. नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी श्री. जोशी यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासुन चोरट्यांचा शोध घेतला जाईल,अशी माहिती पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या