💥परभणी जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालकांचा उद्या १८ डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळाबंद मध्ये सक्रीय सहभाग...!


💥महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने पुकारलाय उद्याचा राज्यव्यापी बंद💥

परभणी (दि.१७ डिसेंबर) - राज्य शासनाने चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांसंदर्भात घेतलेले निर्णय तात्काळ रद्द करावेत या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने उद्या शुक्रवार दि.१८ डिसेंबर २०२० रोजी राज्यव्यापी बंदचे आवाहन केले असून या राज्यव्यापी बंद मध्ये जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालकही सक्रीय सहभाग नोंदवणार आहेत. 

माध्यमिक शाळा संहितेत शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या पदांची संख्या निश्‍चित करण्याबाबतचे निकष आणि नियुक्तीची कार्यप्रणाली कार्यान्वित आहे. आजतागायत या संहितेत आणि कायद्यात कोणताही बदल केल्या गेले नाहीत, परंतु या कायद्यात राज्य सरकारने बदल करण्याचे कोणतेही निकष न पाळता नव्याने काही निर्णय घेतले आहेत. तेच निर्णय असंवैधानिक आहेत, असे मत राज्य शिक्षण संस्था महामंडळाने व्यक्त केले. सद्यस्थितीत अनेक शाळांमधून अत्यावश्यक असलेली पदेही चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची आहेत. असे असतांनाही ही पदे राज्य सरकारने रद्द केल्याने शाळांसमोर अनेक प्रश्‍न उभे राहीले आहेत.  विशेषतः स्वच्छता आणि सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, असेही मत व्यक्त केले. राज्य सरकारने हा वादग्रस्त निर्णय मागे घ्यावा, यासाठी शुक्रवारी राज्यव्यापी शैक्षणिक संस्थांचा बंदचे आवाहन महामंडळाने केले असून यानंतरही सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास बेमुदत शाळाबंद आंदोलन केले जाईल. गरज भासल्यास जेलभरो आंदोलनही केले जाईल, असा इशारा महामंडळाचे राज्य सचिव माजी आ. अ‍ॅड. विजय गव्हाणे यांनी दिला आहे. राज्यातील विना अनुदानीत घोषित-अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना त्वरीत अनुदान द्यावे, 2019-20 चे वेतनोत्तर अनुदान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरीत वितरीत करावे, मोडकळीस आलेल्या व धोकादायक शाळांच्या बांधकामासाठी विशेष अर्थसहाय्य करावे यासह अन्यही मागण्या प्रलंबित आहेत, असेही गव्हाणे यांनी म्हटले.

दरम्यान, महामंडळाने पुकारलेल्या या आंदोलनात परभणी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष डॉ. विवेक नावंदर, कार्याध्यक्ष उदय देशमुख, सचिव बळवंत खळीकर, उपाध्यक्ष संतोष धारासूरकर, सूर्यकांत हाके, कोषाध्यक्ष अनिल तोष्णीवाल, जिल्हा समन्वयक रामकिशन रौंदळे, विजय जामकर, अनिल नखाते, गणेशराव रोकडे, रामराव उबाळे, मुंजाजी भाले पाटील, राजेंद्र लहाणे, आनंद अजमेरा, निसार पटेल, रहीम पठाण, नवनाथ मुजमुले, दिपक तापडीया, शंकरराव वाघमारे, हरिभाऊ शेळके, प्रा.विनायकराव कोठेकर, प्रा.तुकाराम साठे, लक्ष्मीकांत देशमुख, प्रदीप कोकडवार  यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या