💥परभणी येथील नवा मोंढा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील आनंद नगरात विशेष पथकाची हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड....!

 


💥पथकाने टाकलेल्या धाडीत १ लाख ८ हजार ५५० रुपयांच्या नगदी रक्कमेसह ३,५५,५५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त💥 

परभणी (दि.२५ डिसेंबर) - शहरातील आनंद नगर परिसरात चालत असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर आज शुक्रवार दि.२५ डिसेंबर २०२० रोजी रात्रीच्या सुमारास जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींसह अवैध धंद्यांचा विमोड करण्यासाठी स्थापण केलेल्या विशेष पथकाने जिल्हा पोलिस अधिक्षक मिना यांच्या आदेशा वरून व अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक मुमका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी धाड टाकून सात जुगारड्यांना ताब्यात घेत त्यांच्या कडील नगदी १ लाख ८ हजार ५५० रुपयांची नगदी रक्कम जुगार साहित्यासह ३ लाख ५५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन हाय प्रोफाईल जुगार अड्डा उध्वस्त करण्याची धाडसी कारवाई केल्याने अवैध धंद्यांचा काळाकारभार चालवणाऱ्यांच्या तंबुत घबराट निर्माण झाली असून या धाडसी कारवाई वेळी विशेष पथकाचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार,सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विश्वास खोले,सहकारी पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ,यशवंत वाघमारे,राहूल चिंचाने,शंकर गायकवाड़,जमीर फरुकी,विष्णु भिसे,दीपक मुदिराज आदींची उपस्थिती होती....

                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या