💥दिग्रस उच्चपातळी भूसंपादित जमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना तात्काळ मिळणार...!


💥आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी जिल्हाधिकाऱ्या सोबत घेतली महत्वपूर्ण बैठक💥

परभणी (दि.9 डिसेंबर) दिग्रस उच्च पातळी बंधारा भूसंपादित जमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा याकरिता बुधवार दि.9 डिसेंबर 2020 रोजी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी जिल्हाधिकारी परभणी व या संबंधित इतर प्रमुख अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. 

        दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यामुळे गोदाकाठालगतच्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या असून आज तागायत त्यांना कसल्याच प्रकारचा मावेजा  मिळालेला नाही. दिग्रस,फरकांडा,जवळा ता. पालम, महागाव, बानेगाव,धानोरा काळे ता. पूर्णा, या गावातील अनेक शेतकऱ्यांना पूर्णपणे मोबदला मिळाला नाही.संयुक्त मोजणी झालेल्या गुळखंड, फळा, मुंबर व तसेच उर्वरित गावे, सोमेश्वर,आरखेड, घोडा,शिरपूर,उमर्थडी, सायळा, कापशी, रावराजूर, सावंगी,

पालम,पिपरी, गोळेगाव,देऊळगाव,देवठाणा, वाझुर,खरबडा, धासाडी,आंगलगाव या गावांना मावेजा मिळाला नाही. सादरील गावांना लवकरात लवकर मावेजा मिळावा म्हणून आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मा.जिल्हाधिकारी परभणी यांच्यासह जिल्हा मुद्रांक अधिकारी परभणी, उपविभागीय अधिकारी गंगाखेड, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख परभणी, उपविभागीय भूमिअभिलेख पालम व पूर्णा दुय्यम निबंधक पालम व पूर्णा, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी, कार्यकारी अभियंता वि.प्र.वि.क्र.2 नांदेड आणि सहाय्यक नगररचनाकार परभणी यांच्यासोबत भूसंपादन मावेजा प्रश्न  मार्गी लावण्याकरिता बैठक घेतली. उरलेल्या सर्व क्षेत्राची मोजणी व दर निश्चिती 31 जानेवारी पर्यंत पूर्ण करू अशी कबुली अधिकाऱ्यांनी दिली. तसेच प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार अथवा मंगळवारी याबाबतीत महिन्याची आढावा बैठक आयोजित करणार असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. उर्वरित लाभार्थ्यांना मार्च 2021 पर्यंत भूसंपादन मावेजा मिळालाच पाहिजे असे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

          आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या सततच्या प्रयत्नामुळे  दिग्रस उच्च पातळी बंधा-यामध्ये भुसंपादित शेतकऱ्यांना मावेजा लवकरच मिळणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या