💥परभणी शहरातील अशोक नगरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मटका जुगार घेणार्‍या मामा-भाच्यास रंगेहात पकडले...!


💥स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला💥

परभणी (दि.११ डिसेंबर) शहरातील अशोक नगर परिसरात अवैध मटका जुगार घेणाऱ्या मामा-भाच्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल गुरूवार दि.१० डिसेंबर २०२० रोजी दुपारच्या सुमारास ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील मटका जुगार साहित्यासह १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची धाडसी कारवाई केली.

जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्वया आदेशा वरून व अप्पर पोलिस अधिक्षक श्री मुमका सुदर्शन यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरिक्षक साईनाथ पुयड व पथकातील सहकारी कर्मचारी हनुमंत जक्केवाड,हरिश्चंद्र खुपसे,बालासाहेब तुपसुंदरे,दिलावर खान हे शहरात गस्त घालत असताना त्यांना अशोक नगरात मटका जुगार चालवत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाने नवामोंढा पोलिस स्थानकाचे कर्मचारी नागरगोजे यांच्यासह मिळालेल्या माहितीच्या आधारे अशोक नगरात रस्त्यावर दोघेजण पैसे घेऊन मटक्याच्या आकड्याच्या चिठ्ठ्या लिहून देत जुगार चालवत असल्याचे त्यांना दिसले. पथकाने त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता खाजा खान याच्यासह त्याचा भाचा इमरान खान  या मामा-भाच्याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५ हजार ६८० रुपये नगदी रक्कमेसह २ मोबाईल असा एकूण १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल तसेच जुगाराचे साहित्य जप्त असून सदरील मटका बहाद्दर मामा-भाच्यास नवामोंढा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. हरिश्चंद्र खुपसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास श्री. नागरगोजे हे करीत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या