💥पुर्णेतील जीओं कार्यालय बनले शोभेची वास्तू; नागरिक जीओच्या सुविधांपासून वंचित....!


💥तालुक्यातील नागरीकांना जीओ कंपनीकडून सुविधा मिळव्यात या मागणीचे निवेदन तहसीलदार टेमकर यांना देण्यात आले💥

पूर्णा (दि.२३ डिसेंबर) येथील जिओ कार्यालय असून नसल्यागत झाले असून जीओ कार्यालय निव्वळ शोभेची वास्तू झाल्याने जीओ कार्ड धारकांची कुचंबना तर होतच आहे शिवाय सदरील कार्यालय फक्त नावालाच कोणतीही सुविधा दोन तीन दिवस संपर्क केल्यास परत परभणी कार्यालयात पाठवले जाते म्हणून पूर्णा तालुक्यातील नागरीकांना जीओ कंपनीकडून सुविधा मिळव्यात आशा मागणीचे  निवेदन तहसीलदार पल्लवी टेमकर यांना देण्यात आले आहे . 

          तालुक्यातील ६५ गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर झाले असुन अनेक उमेदवार फ्रॉर्म भरण्याची तयारी करत आहे परंतु मोबाईल कार्ड हे जिओ कंपनीचे आहे त्यात बिघाड झाल्याने दुरूस्ती व नविन कार्ड इतर सुविधा वेळेवर मिळत नाहीत व परभणी येथे पाठवले जाते म्हणून तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयात आज बुधवार दि.२३ डिसेंबर २०२० रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे . मागणीवर शिवाजी आगलावे , राजु पिडगे , गणेश आगलावे , पंढरीनाथ कदम , गंगाधर जोगदंड यांच्यासह अनेक नागरीकांच्या स्वाक्षरी आहेत . 

----------------------------------***-------------------------------- 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या