💥पुर्णेत विशेष पथकाची धाडसी कारवाई; शासकीय स्वस्त धान्यातील काळाबाजारात जाणारा १२४ पोते साठा केला जप्त...!


💥पथकाने केलेल्या कारवाई १ लाख २० हजार रुपयांचा गहु, तांदूळ,दाळ,साखर मुद्देमाल जप्त २ आरोपी विशे ताब्यात💥

पुर्णा (दि.१९ डिसेंबर) - शहरातील तहसिल कार्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या महात्मा फुले नगरातील एका घरात काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी जमा करून ठेवलेले १ लाख २० हजार रुपये किंमतीचे गहु,तांदूळ,दाळ,साखर शासकीय स्वस्त धान्याच्या मालाच्या साठ्यावर पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकातील धाडसी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज शनिवार दि.१९ डिसेंबर २०२० रोजी दुपारच्या सुमारास छापेमारी करीत दोघांना ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी पुर्णा पोलिस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात विशेष पथकाने तक्रार दाखल केली आहे.

  पुर्णा तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्य मालाचा काळाबाजार होत असल्याची खात्री लायक माहिती पोलीस अधिक्षक यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकास मिळाली यावरुन पथकातील सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार,पोकाॅ.सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ,यशवंत वाघमारे,राहूल चिंचाणे,शंकर गायकवाड़,जमीर फरुकी,विष्णु भिसे ,दिपक मुद्दिराज आदींनी अगदी तहसिल कार्यालयाच्या भिंतीस लागुन असलेल्या महात्मा फुले नगरात शनिवारी सकाळ पासूनच सापळा लावला.येथील रतन गरंडवाल नामक व्यक्तीच्या घरात स्वस्त धान्याच्या साठा असल्याची खात्री होताच विशेष पथकाने पुर्णा पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रविण धुमाळ,नायब तहसीलदार डि.व्ही.कोकाटे यांना पंचासमक्ष घेऊन पाहाणी केली यावेळी पथकास स्वस्त धान्य दुकानातील गहु,तांदूळ,दाळ,साखरचे पोते आढळून आले.त्यांनी सदरील घरमालकास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे घर त्याने स्वप्निल साळवे यांना भाड्याने दिले असल्याचे सांगितले.यावरुन स्वप्निल साळवे यास बोलावून घेत त्याची चौकशी केली यावेळी त्याने सुभाष विठ्ठल मल्हारे रा.कानखेड व नांदेड येथिल अकबर यांचे मदतीने शासकीय वितरण प्रणालीतील धान्य काळ्या बाजारात चढ्या भावाने विकतो असे सांगितले.सदरील ठिकाणाहून मध्यप्रदेश स्टेट सिव्हील सप्लायर्स कार्पोरेशन लिहलेले नायलाॅनचे४३ हजार २०० रुपये किंमतीचे ५० किलो वजनाचे गव्हाचे ४८ पोते ,३२ हजार २५० रुपये किंमतीचा जुटच्या ५० किलो वजनाचे ४६ पोत्यातील तांदूळ,तसेच नायलाॅनच्या पोत्यात ५० किलो वजनाची १० पोते ४० हजार रुपये किंमतीची हरबरा डाळ,तर ४ हजार ८६० रुपये किंमतीची ३५ किलो वजनाची २ पोते साखर असा १२४ पोते १ लाख २० हजार ३१०रुपये किंमतीच्या मुद्देमालाचा पंचासमक्ष पंचनामा करून रितसर जप्त करून सदरील मुद्देमाल हा पुर्णा पोलिस ठाण्यात जमा केला.याप्रकरणी पुर्णा पोलिस ठाण्यात पो.उप.नि.चंद्रकांत पवार यांनी रिपोर्ट दिला असून . याप्रकरणी  तहसीलदार पूर्णा यांचे अहवाल नंतर कायदेशीर कारवाई होणार आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या