💥मानवत पोलिस स्थानकाच्या हद्दीतील रामेटाकळीत विशेष पथकाची हाय प्रोफाईल जुगार अड्यावर धाड..!

 


💥धाडसी कारवाईत नगदी ३९ हजार ७२० रुपयांसह साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त,आठ आरोपी ताब्यात💥

परभणी (दि.६ डिसेंबर) - परभणी जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी अवैध धंद्यांसह गुन्हेगारी प्रवृत्तींचे कंबरडे मोडण्यासाठी स्थापण केलेल्या विशेष पथकातील कर्तव्यनिष्ठ पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार व विश्वास खोले यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ,यशवंत वाघमारे,राहूल चिंचाने,शंकर गायकवाड़,अजहर पटेल,विष्णु भिसे,दिपक मुदिराज यांनी आज रविवार दि.६ डिसेंबर रोजी दुपारी ४-०० वाजेच्या सुमारास जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अप्पर पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मानवत पोलिस स्थानकाच्या हद्दीतील रामेटाकळीत बेकायदेशीपणे चालत असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्यावर धाडसी कारवाई करीत तब्बल आठ आरोपींसह नगदी रक्कम ३९७२०/- रुपयें,७ मोटर सायकल अंदाजे किंमत २,१०,०००/-रुपयें, १ स्कार्पियो अंदाजे किंमत १०,०००००/-रुपयें असा एकून १२ लाख ४९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्याची अत्यंत धाडसी कारवाई केली असून विशेष पथकाने केलेल्या धाडसी कारवाई बद्दल त्यांचे जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीणा आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांनी अभिनंदन केले आहे... टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या