💥परभणी जिल्ह्यात केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधातील बंदला उस्फुर्त प्रतिसाद.....!


💥परभणी-वसमत मार्गावरील झिरो फाटा येथे सर्वपक्षिय आंदोलन कर्त्यांनी केला रास्ता रोको💥


परभणी (दि.९ डिसेंबर) - परभणी जिल्ह्यात केंद्र शासनाने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्या विरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला जिल्ह्यातील परभणी-वसमत मार्गावरील झिरोफा येथे कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन कर्त्यांनी 'रास्ता रोको' आंदोलन केले यावेळी बराच वेळ ट्राफीक जाम झाली होती.केंद्रातील पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जाचक असा नवीन कृषी कायदा शेतकऱ्यांवर लादल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या भारत बंद आंदोलनात महाविकास आघाडी-स्वाभिमानी शेतकरी संघटना व वंचित बहुजन आघाडीच्या लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला जिल्ह्यातील परभणी,मानवत,सेलू,सोनपेठ,गंगाखेड,पालम,पुर्णा तालुक्यांमध्ये सुध्दा शेतकऱ्यांच्या समर्थनाथ व्यापाऱ्यांनी आपआपली व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवून केंद्र सरकारच्या जाचक कृषी धोरणाचा निषेध नोंदवला पुर्णा तालुक्यात तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.गोवर्धन भुमे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी केद्राच्या जाचक कृषी कायद्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या डाॅ.धर्मराज चव्हाण,इंजि.चंदासिंग बावरी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रत्नामाला प्रभागकर चव्हाण,शेतकरी संघटनाचे व्यंकटराव काळे यांनी उपविभागीय पौलिस अधिकारी सुभाष राठोड व पो.नि.भुमे यांना निवेदन दिले....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या