💥पुर्णेत महावितरण विरोधात एम.आय.एमचे उपोषण सुरू....!


💥उपअभियंता कार्यालयासमोर आज सोमवार २१ डिसेंबर पासून पासून आमरण उपोषणाला सुरुवात💥 

पूर्णा (दि.२१ डिसेंबर) - महावितरण कंपनीने शहराबाहेर हलवलेले शहरकार्यालय पुन्हा शहरातच कार्यान्वीत करावे, सिंगापूर ते नांदेड दरम्यान रस्त्यावरील भुमिगत वाहीन्यांच्या निकृष्ट कामाची चौकशी करून कारवाई करावी,मस्तानपुरा नवीआबादी येथिल रोहीत्र सुरू करावे आदीं मागण्यांसाठी एम.आय.एमचे शहराध्यक्ष हबीब बागवान व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील उपअभियंता कार्यालयासमोर सोमवार २१ रोजी पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

      एम.आय.एम चे शहराध्यक्ष हबीब बागवान यांनी मागील काही दिवसांपुर्वी येथिल उप अभियंता यांच्या  गैरकारभार व मनमानी कारभारा विरोधात महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधीका-यांकडे तक्रार दाखल केली होती.आज सोमवारी येथिल उप अभियंता कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.उपोषणाच्या समर्थनार्थ एम आय एमचे  मो.शफीक मो.रफीक सय्यद अतिक, मोहसीन पठाण,ईलीयास भाई बरतनवाले,सय्यद मुख्तार ,मो.जमील, आसाराम भंगे,राजु वेडे,मिना मस्के,तसलीम तांबोळी अरुणाबाई बाणमारे, राहुल गवळी ,वच्छलाबाई गवळी सय्यद इरफान ,सय्यद फयाज सादेक तांबोळी शब्बीर पठाण आदींनी उपोषणाला पाठींबा दर्शविला आहे.यावेळी बोलताना हबीब बागवान यांनी सांगगितले की,येथिल उप अभियंता नाईक यांनी मनमानीपणे शहरात जनतेच्या सुविधेसाठी मागील अनेक वर्षांपासून शहरात असलेले कनिष्ठ अभियंत्याचे कार्यालय पंधरा दिवसांपासून शहराबाहेर ताडकळस रस्त्यावर हलवल्यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सदरील कार्यालय पुर्वरत शहरात स्थापीत करावे.तसेच सिंगणापुर ते नांदेड दरम्यान राज्यमार्ग रस्त्याच्या कामालगत भुमिगत वाहीन्यांचे काम सुरू आहे.सदरील कामाचा दर्जा सुमार व निकृष्ट असतानाही कंत्राटदारांशी संगनमण करून निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे त्याकामाची चौकट करुन कार्यवाही करावी. मस्तानपुरा नवीआबादी परिसरातील अनेक दिवसांपासून बंद असलेले रोहीत्र कार्यान्वीत करावे या मागण्यांच्या मंजुरी साठी   आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषणाला सुरुवात केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या