💥पुर्णा तालुक्यातील गौर येथील कमलाबाई पारवे यांचे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने दुःखद निधन...!


💥ॲड.मारोती तुकारामजी पारवे यांच्या त्या मातोश्री होत💥

पुर्णा (दि.१९ डिसेंबर) - येथील कमलाबाई तुकारामजी पारवे यांचे आज शनिवार दि.१९ डिसेंबर २०२० रोजी पहाटे ४-०० वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती,चार मुल,नातवंडे असा मोठा परिवार असून तालुक्यातील विधितज्ञ ॲड.मारोती तुकारामजी पारवे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पार्थिव देहावर आज शनिवारी दुपारी २-०० वाजेच्या सुमारास गावातील हिंदु स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अंत्यविधीस गावकरी मंडळींसह तालुक्यातील असंख्य मान्यवर उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या