💥परभणी जिल्ह्यातील पाथरीत विशेष पथकाने टाकली अवैध मटका बुक्कीवर धाड...!

 


💥विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत जुगार साहित्य मोबाईलसह १६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त💥 

परभणी (दि.५ डिसेंबर) - जिल्ह्यातील पाथरी शहरातील शाईन हाॅटेलचे बाजुला सार्वजनीक ठिकाणी चालत असलेल्या अवैध मटका जुगार बुक्कीवर जिल्ह्याचे कर्तव्यकठोर पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकातील अत्यंत कर्तव्यनिष्ठ व धाडसी पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार,विश्वास खोले यांच्यासह पथकातील सहकारी पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ,यशवंत वाघमारे,राहूल चिंचाने,शंकर गायकवाड़,अजहर पटेल,विष्णु भिसे,दिपक मुदिराज यांनी काल शुक्रवार दि.४ डिसेंबर २०२० रोजी रात्री उशीरा ११-०० वाजेच्या सुमारास धाड टाकून या बेकायदेशीरपणे चालत असलेल्या जुगार अड्यावरील नगदी रूपये,एक मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकंदर १६९००/- रुपयांच्या मुद्देमालासह बिनापरवाना बेकायदेशीर रित्या मिलन मटका जुगार खेळ खेळवीत असतांना आरोपी आरोपी राजेभाऊ रामभाऊ लिंबोटकर वय २० वर्ष रा.हानुमान नगर पाथरी.रियाजोदीन ऊर्फ राशु अन्सारी कट्टू अन्सारी वय ५० वर्ष रा बैकार मोहल्ला पाथरी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात पथकातील पोना.शंकर प्रल्हादराव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पाथरी पोलिस स्थानकात गुरनं.४७७/२०२० कलम १२ (अ) मुबई जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथरी पोलिस स्थानकातील पोना.गजभार हे करीत असून विशेष पथकाने केलेल्या धाडसी कारवाई बद्दल जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक जयंत मीणा आणि अप्पर पोलीस अधिक्षक श्री मुमका सुदर्शन यांनी पथकातील धाडसी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या