💥पुर्णा शहर मागील तिन आठवड्यापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित,पर्यायी व्यवस्थेकडे न.प.प्रशासनाचे दुर्लक्ष...!

 


💥
नदीवरील जेकवेल मधील ७५ एचपी फुटबॉल असेंबली मध्ये तांत्रिक बिघाड; १८ दिवसापासून नागरिक पाण्याच्या प्रतिक्षेत💥पुर्णा (दि.१४ डिसेंबर) - पुर्णा नगर परिषद पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारा मुळे शहरातील नागरिक तब्बल तिन आठवड्यापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित झाल्याचे निदर्शनास  येत असून मागील दि.२५ नोव्हेंबर २०२० पासून पुर्णा नदीवरील जेकवेल मधील ७५ एचपीची फुटबॉल असेंबली खराब झाल्याने सदरील असेंब्लीच्या दुरूस्तीचे काम मागील १८ दिवसापूस कासवगतीने सुरू असतांना नगर परिषद प्रशासनाने अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था केल्याचे निदर्शनास येत असून शहरात निर्माण झालेल्या तिव्र पाणी टंचाई मुळे पाणी विक्रेत्यांना आयतीच 'सुवर्णसंधी' प्राप्त झाल्याचे निदर्शनास येत आहे.

पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी पुर्णा नदीवरील जेकवेल मधील ७५ एचपी फुटबॉल असेंबली मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने येणाऱ्या १० दिवस शहरातील पाणीपुरवठा खंडीत राहिल असे पत्रक दि.२ डिसेंबर २०२० रोजी प्रसिध्द केले होते परंतु मुख्याधिकारी पाटील यांनी दिलेला दहा दिवसांचा कालावधी संपूणही आज पर्यंत जेकलेलची दुरूस्ती झाली नसल्यामुळे व नगर परिषद प्रशासनाने पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कुठलीच पर्यायी व्यवस्था केली नसल्याने शहरातील नागरिकांमध्ये तिव्र असंतोष पसरला आहे... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या