💥पुर्णा पोलिस स्थानकात दाखल अपहरण हत्या प्रकरणातील आरोपी घमंडसिंघ विस महिण्यानंतर विशेष पथकाच्या ताब्यात..!

 


💥मराठवाड्यात गाजलेल्या परळीतील अल्पवयीन युवक-युवतीच्या प्रेम प्रकरणातून युवकाची अपहरणानंतर झाली होती हत्या💥

परभणी (दि.११ डिसेंबर) बिड जिल्ह्यातील परळी (वै) येथिल अल्पवयीन युवक-युवती प्रेम प्रकरणातून घरातून पळ काढून पुर्णेत दाखल झाले होते यातील १७ वर्षीय प्रेमी युवक अजय अशोक भोसले याचे प्रेमीकेच्या नातेवाईक मंडळींनी पुर्णा रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण करुन त्याचा परळी येथे नेऊन अत्यंत क्रुरपणे निर्घुण खुन करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे आॅनर किलींग  प्रकरण घडले होते. 

आपल्या मुलाचे अपहरण केल्याच्या संशयावरून सदरील मुलाच्या आई मंगलबाई भोसले यांनी परळी शहरातील संभाजी नगर पोलीस स्थानकात एकूण ५ आरोपीं विरोधात गुरनं ६६/२०१९ कलम ३६३,३६७,३४ भादवी प्रमाणे रितसर गुन्ह्याची नोंद केली होती सदरील दाखल गुन्हा परळी पोलीसांनी दि.५ मार्च २०१९ रोजी पुर्णा पोलीस प्रशासनाकडे वर्ग केला होता.या गुन्ह्याचा तपास पुर्णा पोलिस प्रशासनाकडून तत्कालीन कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार यांच्याकडे देण्यात आला होता तपास अधीकारी फौजदार चंद्रकांत पवार यांनी या प्रकरणाचा अत्यंत काटेकोरपणे तपास करीत प्रकरणाच्या खोलात जाऊन वेगाने तपासाची चक्रे फिरवत यातील अपहृत तरुण अजय भोसले यांचा शोध सुरू केला.सखोल तपासाअंती त्यांना प्रेमी युवक अजय याचे प्रेमप्रकरणातून अपहरण करून त्याचा निर्घुण खुन करुन त्याचा मृतदेह परळी शहराबाहेर अज्ञात स्थळी पुरुन ठेवल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्यांनी अवघ्या महीन्याभराच्या कालावधीत शास्त्रसुधा पद्धतीने तपास करुन उघडकीस आणले. २५ मार्च रोजी फौजदार पवार यांनी अजय भोसले अपहरण व निर्घृण हत्येचे प्रकरण उघडकीस आणले या घटने प्रकरणी अपहरणासह निर्घण हत्ये संदर्भात कलम ३०२,१२० (ब),भादंवी गुन्ह्यात अट्राॅसिटी कायद्यान्वये ३(२)(५) नुसार वाढ करत या प्रकरणात एकूण सहा आरोपी निष्पन्न करुन यातील रुजूबाई बावरी,शक्तीसिंग बावरी, बच्चनसिंह बावरी,चरणसिंग बावरी यांच्यासह प्रेम प्रकरणाती त्या मुलीसही ताब्यात घेत परळी शहरालगत मोकळ्या जागेतून हत्या झालेला प्रेमी युवक अजयचा मृतदेह शोधून काढला होता या अॉनर किलींग प्रकरणात मयत अजय भोसलेची प्रेमिका आरती कौरने या प्रकरणानंतर काही दिवसांतच शेजारील तेलंगणा राज्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. तर शक्तीसिंग बावरी, बच्चनसिंग बावरी,चरणसिंग बावरी, हे आजही परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असुन या गुन्ह्यातील आरोपी घमंडसिंघ सूरजसिंघ जुंनी व राजूसिंघ बावरी हे दोघे फरार होते.तपासा दरम्यान काहीं दिवसात फौजदार चंद्रकांत पवार यांची बदली झाली.या घटनेस जवळपास २० महिण्यांचा कालावधी होत असतांना नमूद फरार आरोपी सातत्याने पुर्णा पोलीसांना गुंगारा देत होते.

     सदरील गुन्ह्यात पोलीसांना हवा असलेला आरोपी घमंडसिंघ सूरजसिंघ जुंनी हा नुकताच परळी येथे आला असल्याची खात्रीलायक माहिती परभणीचे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.जयंत मिना यांनी स्थापन केलेल्या कर्तव्यनिष्ठ पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार व विश्वास खोले यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकास मिळाली यावरुन पथकातील सहकारी पो.काॅ सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ,यशवंत वाघमारे,राहूल चिंचाणे,शंकर गायकवाड़,अजहर पटेल,विष्णु भिसे यांनी तातडीने काल गुरुवार दि.१० डिसेंबर २०२० रोजी रात्री ०९-०० वाजेच्या सुमारास परळी वैजनाथ शहर गाठले यावेळी परळी रेल्वे पुलाखाली पथकाने सापळा लावला. काही वेळातच आरोपी घमंडसिंघ जुंनी यास पथकाने झडप मारुन त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यास ताब्यात घेऊन थेट पुर्णा पोलिस स्थानक गाठून रितसर पुर्णा पोलीसांच्या स्वाधीन केले.आता या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेणे बाकी आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या