💥परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांची लातूरच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती...!

💥जिल्हा परिषदेचे नविन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एस.टी. टाकसाळे घेणार पदभार💥

परभणी (दि.८ डिसेंबर) - परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांची राज्य शासनाने लातूरच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार देऊन आज मंगळवार दि.८ डिसेंबर रोजी बदली केली.दरम्यान पृथ्वीराज यांच्या जागेवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एस.टी.टाकसाळे यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही शासनाने आदेशात नमूद केले आहे.

श्री.पृथ्वीराज हे कठोऱ व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेत परिचित होते. कोरोनाच्या काळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या जबाबदारीसोबतच जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना विभागाची जबाबदारीही सांभाळली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या