💥भारत बंद ला गंगाखेडकरांचा ऊत्स्फुर्त प्रतिसाद,व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ठेवली दुकाने बंद...!


💥तालुक्यातील विविध पक्ष,संघटनांचे कृषी कायदा रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींना पाठवले निवेदन 💥

गंगाखेड (दि.८ डिसेंबर) : नव्या कृषी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला गंगाखेड शहरात ऊत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यवहार सकाळपासूनच कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. विविध पक्ष, संघटनांच्या वतीने तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देत ही विधेयके रद्द करण्याची मागणी करण्यात आली. 

भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास व्यापाऱ्यांनी ऊत्स्फुर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवा वगळता ईतर सर्व व्यवहार सकाळपासूनच पुर्णतः बंद होते. शहरातील भगवती चौकातून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मुकपणे जावून तहलीसलदारांना निवेदन सादर केले. यातून शेतकरी विरोधातली विधेयके रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी विरोधातील विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली याप्रसंगी विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ओंकार पवार,  तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव, शेतकरी संघट्नेचे जिल्हाध्यक्ष भगवानराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष श्रीकांत भोसले, तालुकाध्यक्ष माधवराव भोसले, शहराध्यक्ष ॲड सय्यद अकबर,शिवसेना जिल्हा ऊपप्रमुख विष्णू मुरकुटे, तालुका प्रमुख अनिल सातपुते, शिक्षक सेनेचे बाळासाहेब राखे, प्रहार जनशक्तीचे सुरेश ईखे,वंचीत बहुजन आघाडीचे यशवंत भालेराव,महिला कॉंग्रेसच्या राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. शुभांगी शिसोदीया,  कॉंग्रेस शहाराध्यक्ष शेख युनूस,साहेबराव चौधरी, कॉंग्रेस सेवा दलाचे रोहीदास घोबाळे, एमआयएमचे तालुकाध्यक्ष सय्यद रुस्तुम, अमजद पठाण, माजी ऊपसभापती माधवराव शेंडगे, समाजवादी पार्टी ते शेख ऊस्मान,ॲड नंदकुमार काकाणी, माजी सरपंच सिद्धार्थ भालेराव, योगेश फड, विक्रम काळे, संतोष समशेटे, कांताबाई कुरूडे, सुनिता घाडगे, रेघाटे काकु, हमाल मापाडी संघटनेचे शे. सरवर आदिंसह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकरत्यांची ऊपस्थिती होती. बंद दरम्यान पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, स.पो.नी.गायकवाड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या