💥माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ.वंदना वाहुळ यांनी शाळांना दिल्या; शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद...!


💥प्रदीर्घ कालावधीनंतर शाळांना सुरवात,शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे शिक्षकात उत्साह💥

सेलू (दि.४ डिसेंबर) - प्रदीर्घ कालावधीनंतर जवळपास आठ महिन्यानंतर बुधवारी  इयत्ता दहावी व बारावीच्या वर्गांच्या माध्यमातून शाळांना सुरवात झाली.यावेळी शाळा सुरू झाल्याने माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ वंदना वाहुळ यांनी जिल्ह्यात शाळांना भेटी देऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत शाळा सुरू होतांना भेटी दिल्याने शिक्षकांमध्ये उत्साह वाढला आहे.शिक्षकांमधून सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत तर विद्यार्थी कोरोनाच्या सर्व सूचनांचे पालन करून शाळेत उपस्थित राहत असल्याने विद्यार्थी देखील ज्ञानार्जन करण्यास प्रतिसाद देत असल्याचे चित्र दिसुन आले.शिक्षणाधिकारी डॉ वंदना वाहुळ यांनी स्वतः शिक्षकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रोत्साहन देऊन चर्चा केली.शाळा सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून आले.

दरम्यान, कोरोनाची कुठलीही धास्ती न बाळगता, व्यवस्थित प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजेच जसे मास्क लावून व  सुरक्षित सामाजिक अंतर ठेवले तर नक्कीच यावर मात करत ज्ञानार्जन करून निश्रि्चत ध्येय गाठू शकतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहूळ यांनी शाळांच्या भेटी दरम्यान केले.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दोन डिसेंबरपासून महापालिका वगळता जिल्ह्यातील सर्व शाळांतील इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग सुरू करावेत, अशा सूचना दिल्या होत्या. त्याबाबतच्या सर्व प्रशासकीय ातळीवरील सर्व तयारी पूर्ण करीत जिल्ह्यातील 399 शाळांची घंटा बुधवारी वाजली. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी मास्क लावून शाळेत प्रवेश केला. पहिलाच दिवस असतानाही विद्यार्थ्यांनी शाळेस बर्‍यापैकी उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे पालकांनी त्या बाबत संमती दिली शाळांना यापुर्वीच दर्शवली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही बर्‍यापैकी दिसून आली.

शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहूळ मानवत येथील जिल्हा परिषद हायस्कूल, शकुंतलाबाई कत्रुवार विद्यालय, के. के. एम. कनिष्ठ महाविद्यालय याठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी डॉ. वाहूळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोरोना विषाणूची भीती न बाळगता प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आपण आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यासाला सुरुवात करावी, अभ्यासाच्या पद्धती निश्रि्चत कराव्यात, आशय समजून घ्यावा, असेही त्या म्हणाल्या...

💥मानवत तालुक्यात 30 पैकी 30 शाळा सुरू💥

-दरम्यान काही ठिकाणी अडचणी आल्याने इतर तालुक्यातील सर्व शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.परंतु मानवत तालुक्यातील मात्र 30 पैकी 30 शाळा सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.


💥शाळा पुन्हा गजबजतील याचा विश्वास आहे ---डॉ वंदना वाहुळ


कोरोनाच्या संकटामुळे अनेक महिन्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत.सुरुवातीला 10 वी व 12 वी चे वर्ग सुरू केले आहेत.हळूहळू शासनाच्या सूचना व आदेशानुसार इतर वर्गही सुरू केले जातील.जिल्ह्यात मी स्वतः शाळांना भेटी देऊन शिक्षक,विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत आहे.सर्वांचा प्रतिसाद चांगला आहे.सर्वांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करून अध्यापन कार्य सुरळीत सुरू ठेवावे.पुन्हा एकदा शाळा गजबजतील असा विश्वास शिक्षणाधिकारी डॉ वंदना वाहुळ यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या