💥ताडकळस पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे यांच्या बदलीमुळे नागरिकांमध्ये नाराजगी...!


💥स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पोलीस अधिक्षकांकडे केली सहाय्यक पो.उपनिरिक्षक तावडे यांची बदली रद्द करण्याची मागणी💥

पूर्णा (दि.२१ डिसेंबर) - तालुक्यातील ताडकळस पोलीस स्थानकात कार्यरत सहाय्यक पोलिस निरिक्षक  सतीश तावडे यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा ताडकळस पोलीस स्थानकात पदभार देण्यात यावा असे निवेदन स्वाभिमानी संघटनेचे पूर्णा तालुकाध्यक्ष पंडित गंगाधर भोसले यांनी आज सोमवार दि.२१ डिसेंबर २०२० रोजी जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.जयंत मिना यांना दिले आहे.

ताडकळस पोलिस स्थानकात कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक तावडे यांची ताडकळस येथून परभणीतून नवा मोंढा पोलिस स्थानकात बदली करण्यात आलेली होती त्यांची झालेली बदली तात्काळ रद्द करण्यात यावी असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले की ताडकळस पोलिस स्थानकातील दोन वर्षाच्या कार्यकाळा मध्ये तावडे यांनी ताडकळस परिसरामध्ये अत्यंत चांगले कर्तव्य बजावले असून अश्या कर्तव्यदक्ष असलेल्या अधिकाऱ्याची ताडकळस परिसराला अत्यंत आवश्यकता असल्याने त्यांच्या बदली मुळे ताडकळस येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे

 अतिशय कर्तव्यदक्ष असलेले पोलीस प्रशासनामध्ये सर्व जनतेस न्याय मिळवून देणारे पत्रकार व नागरिक व ताडकळस परिसरांमध्ये तालुक्यातील सर्व जनतेचा विश्वास संपादन केलेले तावडे यांची बदली झाल्यामुळे सर्वस्तरातून नागरिकांचा नाराजीचा सूर उमटत असून. कर्तव्यदक्ष अधिकारी ताडकळस पोलीस स्टेशनला लाभले असताना अल्पावधीत त्यांची बदली होणे हे ताडकळस परिसरातील नागरिकांचे दुर्भाग्य असून त्याबद्दल सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या