💥ग्रामीण भागातील जनहीतवादी निर्भीड पत्रकारीता आणि नियतीने उपस्थित केलेल्या तिन प्रश्नांची उत्तर....!


💥....शेवटी नियतीही प्रश्नार्थक मुद्रेत ग्रामीण भागातील 'बिन पगारी अन् फुल अधिकारी' पत्रकारांकडे निरुत्तर होऊन बघत राहीली💥

ग्रामीण भागात निर्भीड पत्रकारीता करीत असतांना स्वतःच्या कुटुंबाच्या भविष्याचा यत्किंचितही विचार न करता केवळ सत्यासाठी लेखणीसह स्वतःचे उभे आयुष्य दशकानूदशक झिजवणाऱ्या ग्रामीण भागातील आमच्या सारख्या अन्य तमाम पत्रकार बांधवांनी अश्या प्रकारे मार्ग भरकटलेली पत्रकारीता करू नये असे उशीरा सुचलेले शहाणपण तुम्हाला सांगण्या इतपत शहाणपणाही आता आपल्याकडे उरलेला नाही परंतु नियतीने उपस्थित केलेल्या तिन्ही प्रश्नांची उत्तर मात्र कदाचित तुमच्या मनात सुध्दा अशीच असतील याची मला शंभर टक्के खात्री आहे तर मित्रांनों.. नियतीने उपस्थित केलेल्या तिन्ही प्रश्नांची खालील उत्तर तुमच्या मनाला पटली की नाही याचा सुध्दा तुम्ही एकवेळ विचार कराल अशी अपेक्षा....😅

नियतीने ही एक दिवस आम्हा ग्रामीण भागातील मुक्त पत्रकारांपुढे असे तिन प्रश्न उपस्थित केले की अरे.. तुम्ही जन्म घेतला कोणासाठी ? अन् उभे आयुष्य जगलात कोणासाठी ? आणि शेवटी मरणार तरी कोणासाठी ?

यत्किंचितही संकोच नकरता नियतीने उपस्थित केलेल्या तिन ही प्रश्नांचे अगदी सहज उत्तर आम्ही असे दिले...पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे की आम्ही जन्मलोत आमच्या लेखणीसह आमचे उभे आयुष्य झिजवून या समाजात वावरणाऱ्या सर्व प्राणीगुण संपन्न मनुष्य प्राण्यांतील मानुसकीचा अभ्यास करण्यासाठी अन् दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे की आम्ही जगलोत अश्या नालायक मतलबी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्यातील ५०% लोक न्याय मिळेपर्यंत आमच्याशी इमानदार अन् न्याय मिळाल्यानंतर मात्र बेईमान होतात...अन् तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे की आम्ही मरणार अश्या लोकांसाठी ज्यांना आमच्या जगण्या-मरण्याचे यत्किंचितही महत्व नव्हते बस स्वतःच्या घरावर तुळसीपत्र ठेवून जनहीतास्तव जगत राहिलो अन् लेखणी प्रमाणे सातत्याने आयुष्य झिजवून स्वतःच्या कुटुंबाच्या हालअपेष्टांना कारणीभूत ठरत राहिलो आम्ही दिलेली तिनही प्रश्नांची उत्तर ऐकून शेवटी नियती ही प्रश्नार्थक मुद्रेत आम्हा ग्रामीण भागातील 'बिन पगारी अन् फुल अधिकारी' पत्रकारांकडे अगदी निरुत्तर होऊन बघत राहीली...


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या