💥डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाणच्या दिव्यांगांसाठीच्या विविध मागण्यांना अखेर यश...!


💥नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद,213 दिव्यांगांच्या खात्यावर 158000 रु वर्ग होणार💥

पुर्णा (दि.३ डिसेंबर) शहरात गेल्या अनेक वर्षापासुन दिव्यांगांना राखीव असलेला निधी मिळत नव्हता.त्यासंबंधी डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतिने अध्यक्ष मोहन गुंजकर यांनी दि.२३ आक्टोंबर २०२० रोजी निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेत शहरातील २१३ दिव्यांगांच्या खात्यावर जवळपास १ लाख ५८ हजार रुपये वर्ग करणार असल्याचे सांगितले. योगायोगाने आज गुरूवार दि.३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन आहे.


आजच्या दिवशी शहरातील दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा निधी देऊन त्यांना अनोखी भेट दिली.त्या बद्दल त्यांच्या सर्व दिव्यांगांच्या वतिने सत्कार केला व दिव्यांग प्रतिनिधी म्हणून शे.फारुक,किशोर सुर्यवंशी व शे.खालेद भाई यांचा सत्कार केला. यावेळी सर्व दिव्यांग बांधवांनी त्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून वेळोवेळी पाठपुरावा करुन न्याय मिळवुन दिल्याबद्दल माझाही सत्कार केला. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी सर्व दिव्यांगांना अपंग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व त्यांना सँनिटायझर बॉटल देऊन कोरोना विषयी काळजी घेण्याचे आवाहन केले.

सर्व दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा निधी मिळवुन दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला सुखावणारा होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या