💥परळी तालुक्यातील हेळंब येथील खंडोबा यात्रेतील व्यापक कार्यक्रम रद्द...!


💥यात्रेत पाच मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार पालखी सोहळा; नियम पाळुन दर्शन💥

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-  तालुक्यातील हेळंब येथे दरवर्षी चंपाषष्टी निमीत्त मोठी यात्रा भरते यानिमीत्त तीन दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजीत करण्यात येतात यावर्षी ही यात्रा दि.20 डिसेंबर रोजी येत असुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेनिमित्त आयोजीत करण्यात येत असलेले व्यापक कार्यक्रम रद्द करण्यात आले असुन पाच मानकर्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा करण्याचा निर्णय हेळंब ग्रामस्थांनी घेतला आहे.

     हेळंब येथुन जवळच असलेल्या बोरणा नदीकाठी बोरणाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. स्वतः  खंडोबा हे हेळंब येथे वास्तव्याला होते. त्याचा पुरावा म्हणुन स्नान साठी वापरण्यात येते असलेल्या तीर्थ कुंड आजही उपलब्ध आहे. घोडा बांधन्यासाठी खुट उपलब्ध आहे. व त्याच्या खुना आजतागयत आहेत. श्री खंडोबा मंदिराची दुर दुर ख्याती आहे. दरवर्षी चंपाषष्ठीला इथे मोठी यात्रा भरते. लाखो भाविक दर्शन घेतात.यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा व अनेकप्रकारची दुकाने येतात यावर्षी कोरोनामुळे यात्रेतील कार्यक्रम रद्द करावेत अशा सुचना प्रशासनाने दिल्यानंतर हेळंब ग्रामस्थांनी एकमुखाने निर्णय घेत फक्त पालखी सोहळा पाच मानकर्यांच्या उपस्थितीत घेण्याचे व खंडोबाचे दर्शन सर्व नियम पाळून करण्याचा निर्णय घेतल्याने हेळंब येथील खंडोबा यात्रा साधेपणाने होणार आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या