💥कोरोना प्रतिबंधक लस येईपर्यंत विद्यार्थ्यांनी काळजी घेणे आवश्यक - डॉ.संजय हरबडे


💥सेलू येथील श्री.केशवराज बाबासाहेब विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत तोरण फुलांनी सजविली शाळा💥

सेलू (दि.21डिसेंबर) - कोरोना सध्या आटोक्यात आहे.परंतु इयत्ता 10 वी व 12 वी चे वर्ग आधीच सुरू झालेत.आज 9 वीचे वर्ग सुरू झालेत.यामुळे विद्यार्थ्यांनी कोरोनाची भीती न बाळगता स्वच्छतेच्या सर्व सूचनांचे पालन करून शाळेत यावे व आपले अध्ययन पूर्ण करावे असे मत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय हरबडे यांनी व्यक्त केले.आज इयत्ता 9 वीचे वर्ग सुरू करण्यात आले या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय हरबडे यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.

येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात आज इयत्ता 9 वीतील विद्यार्थ्यांचे उत्साहात व आगळ्यावेगळ्या पद्धतीने  स्वागत करण्यात आले.यावेळी शाळेला फुलांचे तोरण,कार्यालय व परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती.तसेच कोरोना बाबत काळजी घेण्याचे फलक देखील परिसरात लावण्यात आले आहेत.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.एल.एम.सुभेदार,माजी मुख्याध्यापक डी एम नागरे,मुख्याध्यापक पी एस कौसडीकर,सुभाष नावकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलतांना डॉ हरबडे म्हणाले की,सध्या प्रवासात किंवा शहरात वावरतांना नागरिक मास्क किंवा इतर सूचनांचे पालन करतांना दिसत नाहीत.परंतु कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही.विद्यार्थ्यांनी शाळेत येतांना हात स्वच्छ धुऊन येणे गरजेचे आहे तसेच मास्क वापरणे,गर्दी टाळणे आदी दक्षता देखील घेणे आवश्यक आहे.


यावेळी अध्यक्षीय समारोपात संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.एल.एम.सुभेदार म्हणाले की,10 महिन्यानंतर शाळा सुरू होत आहेत.संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्व काळजी घेण्यास शाळा प्रशासन दक्ष आहे परंतु विद्यार्थ्यांनी देखील शाळेत येतांना स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे.अनेक महिन्यानंतर शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहून आपले अध्ययन कार्य पूर्ण करावे . शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यास सक्षम आहे.विद्यार्थ्यांना देखील आता शाळेत येऊन ज्ञानार्जन करणे देखील आवश्यक आहे.सर्व विद्यार्थ्यांना यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी मुख्याध्यापक डी एम नागरे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.


आज शाळेचा पहिलाच दिवस असल्याने व अनेक महिन्यानंतर शाळा सुरू होत असल्याने शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच ग्लोबल टीचर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आदर्श शिक्षक योगेश ढवारे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी कोरोना बाबत घ्यावयाच्या काळजी याबाबत मुख्याध्यापक पी एस कौसडीकर यांनी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार योगेश ढवारे यांनी मानले.
फोटो ओळ:सेलू: येथील श्री के.बा.विद्यालयात इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करतांना वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय हरबडे,संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.एल.एम.सुभेदार,डी एम नागरे,पी एस कौसडीकर,सुभाष नावकर आदी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या